www.24taas.com, मुंबई
राजकीय पक्षांच्या चढाओढीत सामान्य जनतेचा कसा फायदा होतो. याचा सुखद अनुभव सध्या मुंबईतलं पार्लेकर घेत आहेत. जनतेला सेवा देण्यासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये इथं स्पर्धा पहायला मिळतंय. यासाठी शिवसेनेनं स्वस्त भाजीचे दुकान थाटलंय तर मनसेनं फुकटची बससेवा सुरु केली आहे.
पार्लेमध्येही फेरीवाल्यांना बंदी करण्यात आल्यानं नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वस्तात भाजीपाला देणं शिवसनेनेनं सुरु केलंय. शिवसैनिकांनी पाच ठिकाणी स्वस्त भाजीची दुकाने सुरु केली आहेत. तर दुसरीकडं मनसेनं फुकटात बससेवा सुरु केली आहे. रिक्षावाले भाडे नाकारतात त्यामुळं प्रवाशांना त्याचा त्रास होतो. तसंच मनमानी पद्धतीनं जादा पैशाची मागणी करतात.
त्यामुळं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मनसेच्या वतीनं 10 ठिकाणी फुकटात बससेवा सुरु केली आहे. या दोन्ही पक्षांच्या चढाओढीचा फायदा जनतेला होतोय. एवढं नक्की