शिवसेनेने वाटले महिलांना चाकू आणि मिरचीची पूड

महिलांवर होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी पुण्यात एक वेगळाच उपक्रम राबवण्यात आला. हल्ले रोखण्यासाठी महिला सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळं महिलांना चाकू आणि मिरचीच्या पुड्या याचे वाटप करण्यात आले.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 23, 2013, 10:19 PM IST

www.24tas.com, पुणे
महिलांवर होणारे वाढते हल्ले रोखण्यासाठी पुण्यात एक वेगळाच उपक्रम राबवण्यात आला. हल्ले रोखण्यासाठी महिला सक्षम होणे गरजेचे आहे. त्यामुळं महिलांना चाकू आणि मिरचीच्या पुड्या याचे वाटप करण्यात आले.
शिवसेनेच्या वतीने महिलांना आणि मुलींना या वस्तू वाटण्यात आल्या आहेत. पुण्यातील सेंट मीरा आणि वाडिया कॉलेजातील मुलींना या वस्तूंचे वाटप करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे निमित्त साधत महिलांना सुरक्षेसाठी या वस्तूंचे वाटप आकरण्यात आले.
गरज पडल्यास महिलांनी या वस्तूंचा वापर सुरक्षिततेसाठी करावा असं आवाहन शिवसैनिकांनी यावेळी केले.