शिवसेना विरोधी पक्षात बसणार- सूत्र

शिवसेना-भाजप युती संदर्भात चर्चा सुरू असतांनाच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार नाहीय. त्यांनी विरोधी बाकावर बसण्याचं निश्चित केल्याचं समजतंय. 

Updated: Nov 5, 2014, 11:01 AM IST
शिवसेना विरोधी पक्षात बसणार- सूत्र title=

मुंबई: शिवसेना-भाजप युती संदर्भात चर्चा सुरू असतांनाच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार नाहीय. त्यांनी विरोधी बाकावर बसण्याचं निश्चित केल्याचं समजतंय. 

रिपोर्टनुसार शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद हवंय, पण भाजपनं त्यासाठी नकार दिलाय. राज्य विधिमंडळाचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि फडणवीस सरकारसाठी १२ नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करायचं आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून निमंत्रण मिळाल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे भाजप सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिले. त्यावरून हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली. समारंभानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बातचित पण झाली. ४१ आमदारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं यापूर्वीच भाजप सरकारला बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. मात्र ६३ आमदार असलेल्या शिवसेनेला सोबत घेऊन जाणं फडणवीस यांना राज्यातील स्थिर सरकारसाठी चांगला पर्याय असेल. 

त्यामुळं आता अखेरचा निर्णय कधी जाहीर होतो, हे पाहावं लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.