shiv sena

'सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय अधिवेशानापूर्वी'

अधिवेशनापूर्वी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं शिवसेनेकडून अनिल देसाई यांनी सांगितलं आहे. सरकारमध्ये सामील होण्याची कोणतीही घाई नसल्याचं यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

Nov 3, 2014, 06:16 PM IST

भाजप-सेनेची चर्चा पुढे सरकलीय, एक तृतियांश वाटा

अखेर भाजप-शिवसेनेची चर्चा पुढं सरकलीय. शिवसेनेला मंत्रिमंडळात एक तृतियांश वाटा देण्यास भाजपनं तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Nov 1, 2014, 08:30 PM IST

शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह हवीत १० मंत्रिपदं, सूत्रांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला उपस्थित राहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजप-सेनेची पुन्हा युती होण्याचे संकेत दिले आहेत. आता शिवसेना-भाजपमध्ये मंत्रिपदाच्या वाटाघाटीची चर्चा सुरू आहे. 

Nov 1, 2014, 11:07 AM IST

शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता

शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यात चर्चा सुरू झाली आहे.

Oct 31, 2014, 05:45 PM IST

युतीचा निर्णय आता शपथविधी दिनीच होणार

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची उद्या भेट होण्याची शक्यताय. शिवसेनेला बरोबर घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान दिल्लीतील भाजप नेत्यांची बैठक संपलीय. मोदी, अमित शाह आणि फडणवीस यांच्यात तीन तास चर्चा सुरू होती.

Oct 30, 2014, 10:16 PM IST