शिवसेना-भाजपची आज अंतिम चर्चा

शिवसेना सत्तेत सामील होणार की नाही, शिवसेनाला नेमकी कोणती मंत्रिपदं मिळणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आज यावर अंतिम बैठक होणार आहे.

Updated: Nov 4, 2014, 09:25 PM IST
शिवसेना-भाजपची आज अंतिम चर्चा title=

मुंबई : शिवसेना सत्तेत सामील होणार की नाही, शिवसेनाला नेमकी कोणती मंत्रिपदं मिळणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आज यावर अंतिम बैठक होणार आहे.

शिवसेनेचा यापूर्वी उपमुख्यमंत्रीपदासाठी आग्रह होता, असं सांगण्यात येत असलं, तरी उपमुख्यमंत्रीपद राज्यात कुणालाही देणार नसल्याचं भाजपने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

शिवसेना नक्कीच महत्वाच्या मंत्रिपदांची अपेक्षाही आहे, मात्र भाजपने शिवसेनेला याबाबतीत कोणतंही आश्वासन दिलं नसलं, तरी महत्वाच्या पदापासून आधीपासूनच दूर ठेवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजपने एवढे केल्यानंतर आता शिवसेनेच्या हाती काय येणार आहे, शिवसेना भाजपसोबत सत्तेत सामिल होणार किंवा नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.