रोहित वेमुला दलित नाही, जातीचे बनावट प्रमाणपत्र रद्द

 रोहित वेमुला दलित नसल्याचं पुढे आलंय. रोहित वेमुलाकडे असणारं जातीचं प्रमाणपत्र बनावट असून ते रद्द करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 15, 2017, 08:03 AM IST
रोहित वेमुला दलित नाही, जातीचे बनावट प्रमाणपत्र रद्द title=

गुंटुर : आंध्रप्रदेशातल्या गुंटुरच्या जिल्हाधिका-यांनी दिलेल्या चाचपणी अहवालात हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आत्महत्या करणारा रोहित वेमुला दलित नसल्याचं पुढे आलंय. रोहित वेमुलाकडे असणारं जातीचं प्रमाणपत्र बनावट असून ते रद्द करण्याचे आदेशही जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. 

आंध्र सरकारने रोहितच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी एक जिल्हास्तरीय छाननी समिती नेमली होती. या समितीनं मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला. रोहित वेमुला आणि त्याची आई राधिका वेमुला दलित नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेय. 

शिवाय वेमुला कुटुंनानं बोगस जात प्रमाण पत्र मिळवलं असून ते रद्द करण्यात यावं असंही समितीनं म्हटलंय. पण हे प्रमाणपत्र रद्द करण्याआधी वेमुला कुटुंबाकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. 17 जानेवारी 2016 ला रोहित वेमुलानं हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात आत्महत्या केली. 

त्यानंतर देशभर मोठ्याप्रमाणात दलित संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन छेडलं होते. त्यातून रोहितच्या विद्यापीठाचे कुलगुरू आप्पाराव पोडाईल, केंद्रीय कामगार मंत्री बंदारू दत्तात्रेय यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अधिक तपासासाठी साबराबाद पोलीसही रोहितच्या जातप्रमाणपत्र पडताळणी अहवालाची वाट बघत होते.