मुंबई : राज्यात मुंबईसह १० महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समिती निवडणुका होत आहेत. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २१ फेब्रुवारी मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
मतदानाच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने त्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. त्यासाठी अधिसूचना निवडणूक आयोगाकडून काढण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या १० महापालिकांसाठी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे त्यादिवशी या महापालिका क्षेत्रांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तसचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि गडचिरोली या ११ जिल्हा परिषदांकरिता आणि त्यांतर्गत येणाऱ्या ११८ पंचायत समित्यांच्या क्षेत्रातही मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.