भारत विरोधी कारवायांसाठी नेपाळच्या धरतीचा वापर होऊ देणार नाही -पंतप्रधान देउबा

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. एकूण आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. करार झाल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांनी म्हटलं की, 'मी पंतप्रधान मोदी यांच्या शेजारील देशांसोबत आधी संबंध आणि सबका साथ सबका विकास या गोष्टीचं कौतूक करतो.' 

Updated: Aug 24, 2017, 04:08 PM IST
भारत विरोधी कारवायांसाठी नेपाळच्या धरतीचा वापर होऊ देणार नाही -पंतप्रधान देउबा  title=

नवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार झाले. एकूण आठ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. करार झाल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादुर देउबा यांनी म्हटलं की, 'मी पंतप्रधान मोदी यांच्या शेजारील देशांसोबत आधी संबंध आणि सबका साथ सबका विकास या गोष्टीचं कौतूक करतो.' 

नेपाळच्या पंतप्रधानांनी म्हटलं की, 'भारताच्या विरोधात ते त्यांच्या जमीनीचा कधीच वापर नाही होऊ देणार. भारत आणि नेपाळची सिमा एक आहे.' नेपाळचे पंतप्रधानांनी म्हटलं की, मी पीएम मोदी यांना विश्वास देतो की, 'मी कोणत्याही प्रकारच्या भारत विरोधी कारवायांसाठी नेपाळच्या धरतीचा वापर करु नाही देणार.'