शिवसेनेला लोकसभेचं उपसभापतीपद देण्यास भाजप तयार- सूत्र

आज होणा-या मंत्रीमंडळ विस्तारात, मंत्रीपदाच्या यादीमध्ये सध्यातरी शिवसेनेची वर्णी लागली नसली तरी, शिवसेनेला लोकसभेचे उपसभापतीपद देण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे.

Updated: Sep 3, 2017, 09:30 AM IST
शिवसेनेला लोकसभेचं उपसभापतीपद देण्यास भाजप तयार- सूत्र title=

नवी दिल्ली : आज होणा-या मंत्रीमंडळ विस्तारात, मंत्रीपदाच्या यादीमध्ये सध्यातरी शिवसेनेची वर्णी लागली नसली तरी, शिवसेनेला लोकसभेचे उपसभापतीपद देण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे.

सध्या उपसभापतीपदी असलेले थंबी दुराई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागेवर शिवसेनेला उपसभपतीपद देण्याची भाजपनं तयारी दाखलीय. मात्र शिवसेनेला उपसभापतीपदामध्ये रस नसून, शिवसेनेनं मंत्रीपदाचाच आग्रह धरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारामुळं शिवसेनेत नाराजीची भावना पसरली आहे. शिवसेनेकडं सध्या केवळ एकच कॅबिनेट मंत्रीपद असून, किमान आणखी दोन मंत्रीपदं द्यावी, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

दरम्यान, राज्यसभा खासदाराला मंत्रीपद देण्यास शिवसेनेनं विरोध केला आहे. लोकसभेतील खासदारालाच मंत्रीपद द्या, अशा भावना देखील शिवसेना खासदारांनी व्यक्त केल्या आहेत.