नायपिदॉ : पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्यमार दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी रंगून मधल्या शेड्योंग पॅगोडामध्ये दाखल झाले आहे. म्यानमारमधल्या ऐतिहसिक महत्वाच्या पॅगोडाला मोदींनी भेट दिली. यानंतर ते म्यानमारमध्ये दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली वाहणार आहे.
म्यानमारमधून आझाद हिंद सेनेनं भारतीय स्वांत्र्यसाठी लढाई उभी केली होती. त्याच्या आठवणी यावेळी जागवण्यात येतील. विशेष म्हणजे, चीनसोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगचेच मोदी म्यानमारला आले आहेत. राखीन प्रांतात रोहिग्य मुस्लिम दहशतवाद्यांच्या हिंसाचाराची भारतानं सुरू केलेल्या काही विकास प्रकल्पांना थेट झळ पोहोचू शकते. यासंदर्भातही पंतप्रधान म्यानमारच्या नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
Happy to have visited the beautiful & blissful Ananda Temple in the historic city of Bagan. Here are some pictures. pic.twitter.com/M7VwZOALGQ
— Narendra Modi (@narendramodi) September 6, 2017