राणेंचा शिवसेनेवर 'प्रहार', सत्तेसाठी लाचारी

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे केवळ पर्यटक म्हणून कोकणात आले आहेत. तसंच शिवसेनेने कोकणी माणसांची फसवणूक केली असून, सत्तेसाठी लाचार झालेल्या सेनेतील आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं राणे म्हणालेत.

Updated: Nov 23, 2014, 03:36 PM IST
राणेंचा शिवसेनेवर 'प्रहार', सत्तेसाठी लाचारी title=

कणकवली : काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे केवळ पर्यटक म्हणून कोकणात आले आहेत. तसंच शिवसेनेने कोकणी माणसांची फसवणूक केली असून, सत्तेसाठी लाचार झालेल्या सेनेतील आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं राणे म्हणालेत.

भाजप सरकारच्या सत्तेत सहभागी न झाल्यास आमदार फुटतील, अशी भीती शिवसेनेला वाटत आहे. त्यामुळे शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहेत, असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला. उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौ-यावर असून यापार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत शिवसेनेवर 'प्रहार' केला.

शिवसेनेला मंत्रिपद हवे असले तरी त्यांच्याकडे मंत्रिपदाची गुणवत्ता असलेला एकही नेता नाही. उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे केवळ पर्यटन आहे. 'कोकणी माणसा'ने शिवसेनेला ताकद दिली. मात्र, शिवसेनेने कोकणी माणसाची फसवणूकच केली आहे. शिवसेना सत्तेसाठी लाचार असून ते दुसऱ्यांना काय देणार, असा प्रश्नही राणे यांनी यावेळी उपस्थित केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.