municiple council election

विकास आणि गरिबांबद्दलच्या भूमिकेमुळे भाजपचा विजय, पंतप्रधानांचं ट्विट

राज्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या 147 नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे.

Nov 28, 2016, 07:51 PM IST

राज्यात भाजपचे ५१ नगराध्यक्ष, पाहा कोणत्या शहरात?

राज्यातील २२ नगरपालिकांवर भाजपने झेंडा फडकविला आहेत तर एकूण ५१  ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. त्यामुळे नोटबंदी, मराठा आरक्षण आणि इतर मुद्दे या निवडणुकीत भाजपच्या विरोधी गेले नसल्याचे चित्र दिसत आहे. 

Nov 28, 2016, 07:28 PM IST

सांगलीत भाजपची सरशी, राष्ट्रवादी बॅकफूटवर

सांगली जिल्ह्यातल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप, काँग्रेसची सरशी झाली आहे तर राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर फेकली गेली आहे.

Nov 28, 2016, 06:37 PM IST

उमरखेडमध्ये एमआयएमचे आठ नगरसेवक

 यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर परिषदेतील २४ जागांपैकी सर्वाधिक आठ जागा या एमआयएमने जिंकल्या आहेत. 

Nov 28, 2016, 06:06 PM IST

निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली

नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली आहे. 

Nov 28, 2016, 05:37 PM IST

नारायण राणेंची काँग्रेस नेतृत्वावर आगपाखड

नारायण राणेंची काँग्रेस नेतृत्वावर आगपाखड

Nov 28, 2016, 05:24 PM IST

कोकणातल्या निकालाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

कोकणातल्या निकालाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

Nov 28, 2016, 05:23 PM IST

सातारा नगरपालिका ताब्यात घेऊनही उदयनराजे नाराज

सातारा नगरपालिका ताब्यात घेतल्या नंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आलेल्या निकाला बाबत नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता त्यांच्या सातारा विकास आघाडीच्या माधवी कदम आणि 40 पैकी 23 उमेदवार निवडून आलेले असतानाही त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 28, 2016, 05:18 PM IST

सातारा नगरपालिका ताब्यात घेऊनही उदयनराजे नाराज

सातारा नगरपालिका ताब्यात घेऊनही उदयनराजे नाराज 

Nov 28, 2016, 05:14 PM IST

पालघर जिल्ह्य़ातील मंत्री विष्णू सावरांना पराभवाचा धक्का

आदिवासी  विकास  मंत्री  विष्णू  सवरा  यांच्या  विक्रमगड  मतदार संघातील मोखाडा  नगरपंचायत आणि विक्रमगड  नगरपंचायतीच्या निवडणुकीत  भाजपचा दारूण पराभव  झाला  आहे.  

Nov 28, 2016, 04:23 PM IST

माजी मंत्री छगन भुजबळांना झटका

 उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसल्याचं चित्र आहे तर विद्यमान मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. राहता नगराध्यक्षपदावर  काँग्रेसचा दारूण पराभव झालाय. तसंच भाजप आणि महायुती आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. 

Nov 28, 2016, 04:20 PM IST

कोकणात शिवसेनेची मुसंडी

कोकणात पार पडलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात जनसामान्यानी नगरसेवक निवडून देताना शिवसेनेच्या पदरात भरभारुन माप टाकल्याचे पहायला मिळालं.

Nov 28, 2016, 04:09 PM IST

शहादा नगरपालिकेत काँग्रेसला धक्का

शहादा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे भाजपा चे नगरध्यक्ष पदासाठी मोतीलाल फकिरा पाटील 1350 मतांनी विजयी झाले आहेत भाजपा नेते डॉ विजयकुमार गावित आणि खासदार डॉ हिना गावित यांनी एकतर्फी लढा देत शहाड्यातील विजयीश्री खेचून आणली आहे काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्षांचा बड्या नेत्याचा सभा झाल्या होत्या मात्र भाजप कडून डॉ विजयकुमार गावित डॉ हिना गावित यांनी शहादा शहर पिजून काढला होते काँगेस ने गेल्या दहा वर्षात कोणताही विकास न केल्याने नाकरल्याचे सांगितले 

Nov 28, 2016, 03:03 PM IST

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण तर इस्लामपुरात जयंत पाटलांना धक्का

नगरपालिकांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रस्थापितांना धक्का बसलाय. तर काही दिग्गजांनी प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. 

Nov 28, 2016, 02:31 PM IST