रत्नागिरी : कोकणात पार पडलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात जनसामान्यानी नगरसेवक निवडून देताना शिवसेनेच्या पदरात भरभारुन माप टाकल्याचे पहायला मिळालं. 4 नगर पालिकांमध्ये केवळ एकाचा ठिकाणी रत्नागिरीत शिवसेनेचे राहुल पंडित विजयी झाले असले तरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या नगर सेवकांमध्ये चांगलीच भर पडली आहे.
खेड नगर पालिकेत मनसे राष्ट्रवादीचे वैभव खेडेकर नगराध्यक्षपदी निवडून आले असले तरी मनसेच्या वर्चस्वाला धक्का देत शिवसेनेने 17 पैकी 10 नगरसेवक निवडून आणलेत इथे भाजपला खातेही खोलता आले नाही.
रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत 30 पैकी 17 नगरसेवक निवडून आणलेत आणि नाराध्यक्षदेखील शिवसेनेचे विराजमान झालाय भाजपला केवळ 6 जागा मिळाल्या आहेत.
चिपळूणातही शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीला धक्का देत शिवसेनेचे 10 नगर सेवक निवडून आलेत. भास्कर जाधव यांची नाराजी इथे राष्ट्रवादीला चांगलीच भोवली असून राष्ट्रवादीच्या केवळ 4 जागा निवडून आल्यात इथे मात्र भाजपला सेनेतून आयत्यावेळी भाजपामध्ये आलेल्या सुरेखा खेराडे यांच्या रूपाने नागराध्यक्ष पदाची लॉटरी लागली आहे. भाजपने 5 जागांसह खत खोललं आहे.
राजपुरात काँग्रेसने नगराध्यक्ष हनीफ काझी यांच्या रूपाने गड राखला असला तरी राजापूर शहरात 8 जागा जिंकत राजापूर नगर पालिकेत आपली ताकद वाढवली आहे. दापोली नगर पंचायत मध्ये शिवसेनेनं आपला गड राखल्याचे पहायला मिळते आहे. दापोली नगर पंचायतमध्ये शिवसेनेचे 7 नगरसेवक निवडून आले आहेत मात्र इथे कोणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने ही नगर पालिका त्रिशंकु अवस्थेत गेली आहे.