एकच हृदय कितीवेळा जिंकणार रतन टाटा! एक निर्णय आणि 115 कर्मचाऱ्यांची 'अशी' वाचली नोकरी

Ratan Tata:  कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या कर्मचाऱ्यांची नोकरी रतन टाटा वाचवत आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Jul 2, 2024, 01:03 PM IST
एकच हृदय कितीवेळा जिंकणार रतन टाटा! एक निर्णय आणि 115 कर्मचाऱ्यांची 'अशी' वाचली नोकरी title=
Ratan Tata Save TISS Employee Jobs

Ratan Tata: जेव्हा कधी विश्वासार्हतेबद्दल बोललं जातं तेव्हा डोळे बंद करुन लोकं टाटा ब्रॅण्डचे नाव घेतात. जनतेला तितकाच विश्वास रतन टाटांवर आहे. रतन टाटांबद्दल सर्वांना मनातून आदर येतो. आपले समाजकार्य आणि परोपकारासाठी ते ओळखले जातात. एकीकडे मोठमोठ्या कंपन्या पैसे वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांचा विचार न करता मोठी कपात करत आहेत. दुसरीकडे रतन टाटा हे कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवलेल्या कर्मचाऱ्यांची नोकरी वाचवत आहेत.

रतन टाटांनी वाचवली नोकरी 

जगातील टॉपच्या श्रीमंतांच्या यादीत रतन टाटा कदाचित दिसणार नाहीत. पण परोपरकारासाठी पैसे खर्च करताना मागे पुढे न पाहणाऱ्या व्यावसायिकांमध्ये तेच टॉपला असतील. टाटा इंस्टिट्यूट ऑफ सायन्सच्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. फंड उपलब्ध नसल्याने टीसने 28 जूनला 115 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. 55 फॅकल्टी मेंबर्स आणि 60 नॉन टिचिंग स्टाफच्या नोकरीवर तलवार फिरत होती. पण 30 जूनला अचानक कपात थांबवण्यात आली.

रतन टाटांनी केली मदत 

कर्मचाऱ्यांची कपात रोखण्यासाठी रतन टाटांच्या पुढाकाराने टाटा एज्युकेशन ट्रस्टने टीसला आर्थिक सहाय्य पुरवण्याचा निर्णय घेतलाय. रतन टाटांनी पैसे देऊन 115 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवल्या. आर्थिक अडचणीत सापडलेल्या TISS ला टाटा ट्रस्टने फंड देण्याचा निर्णय घेतलाय. ट्रस्टने टीसचे प्रोजेक्ट, प्रोग्राम आणि नॉन टिचिंग स्टाफचा पगार, इतर खर्च यासाठी नवीन फंड जारी केलाय. या फंडमुळे 115 कर्मचाऱ्यांची नोकरी वाचली. 

88 वर्षे जुनी संस्था अडचणीत 

टाटा समुहाची टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची सुरुवात 1936 मध्ये सर दोराबजी टाटा यांनी याचे नाव टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क असे ठेवले होते. पण 1944 मध्ये याचे नाव बदलून टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ठेवण्यात आले. यानंतर संस्थेला मोठे यश मिळाले. 1964 मध्ये संस्थेला डिम्ड विद्यापाठीचा दर्जा मिळाला. टाटांच्या या शिक्षण संस्थेत मानवाधिकार, सामाजिक न्याय आणि डेव्हलपमेंट स्‍टडीजचे शिक्षण दिले जाते. पण गेल्या काही वर्षांमध्ये येथे फंडची कमी भासतेय.