'...म्हणून राहुल द्रविड यांनी पुन्हा हेड कोचसाठी अर्ज केला नाही', जय शहा यांचा मोठा खुलासा

'...म्हणून राहुल द्रविड यांनी पुन्हा हेड कोचसाठी अर्ज केला नाही', जय शहा यांचा मोठा खुलासा

Jay Shah On Rahul Dravid : राहुल द्रविड यांच्यासमोर पुन्हा हेड कोचपदाची (Team India head coach) ऑफर असताना त्यांनी अर्ज का केला नाही? यावर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी उत्तर दिलंय.

सौरभ तळेकर | Updated: Jul 2, 2024, 05:00 PM IST
'...म्हणून राहुल द्रविड यांनी पुन्हा हेड कोचसाठी अर्ज केला नाही', जय शहा यांचा मोठा खुलासा title=
Jay Shah On Rahul Dravid

Team India head coach : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरताच राहुल द्रविड यांचा हेड कोच म्हणून कार्यकाळ समाप्त झाला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने देखील आगामी पावलं उचलली अन् मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मावगले होते. बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीने मुलाखतीच्या माध्यमातून दोन नावं निश्चित केली होती. यातील एका नावावर लवकर मोहोर लागेल. श्रीलंका मालिकेपूर्वी भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळेल, असं आश्वासन जय शहा यांनी दिलं होतं. अशातच टीम इंडियाला लवकर नवा मार्गदर्शक मिळेल. अशातच राहुल द्रविड यांनी पुन्हा अर्ज का केला नाही? यावर जय शहा यांनी उत्तर दिलंय.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी अर्ज मागवताना राहुल द्रविड यांच्यासमोर देखील पर्याय ठेवला होता. राहुल द्रविड पुन्हा एकदा अर्ज करू शकतात, असं जय शहा यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, राहुल द्रविड यांनी अर्ज केला नाही. त्यावर जय शहा यांनी नेमकं कारण काय होतं? यावर खुलासा केला आहे. 

काय म्हणाले जय शहा?

राहुल द्रविड यांनी जो निर्णय घेतला होता, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता. त्यामुळे आम्ही त्या निर्णयाचा सन्मान केला. द्रविडने मला सांगितलं होतं की कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तो भविष्यात प्रशिक्षकाची भूमिका बजावू शकणार नाही, कारण त्याला त्याच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. बीसीसीआय नक्कीच राहुल द्रविडच्या निर्णयाचा आदर करतं आणि म्हणूनच आम्ही त्याच्यावर दबाव टाकला नाही, असं जय शहा म्हणाले.

दरम्यान, बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने भारताच्या नवीन प्रशिक्षकाची मुलाखत घेतली होती. या समितीने मुख्य प्रशिक्षकपदासाठी दोन उमेदवारांची निवड केली आहे, अशी माहिती जय शहा यांनी दिली होती. त्यापैकी एकाचं नाव लवकरच निश्चित केलं जाईल, असंही जय शहा यांनी म्हणालं आहे.

गौतम गंभीरचं नाव निश्चित?

क्रिकेट सल्लागार समितीने कोलकाता नाईट रायडर्सचा कोच आणि माजी स्टार खेळाडू गौतम गंभीरचं नाव निश्चित केल्याची माहिती समोर आली होती. भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक डब्ल्यूव्ही रमन यांचे नावही शॉर्टलिस्ट केल्याचं देखील समोर येतंय.  त्यामुळे अखेर कोणाचं नाव निश्चित होणार? यावर सर्वांचं लक्ष लागलंय.