mns

राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण! सणासुदींच्या उधळणीत धरला फेर; पाहा Video

Ankita Patil Thackarey Share Video : महाराष्ट्राच्या राजकारणात खो खो सुरू असताना, राजकारण्यांच्या सौभाग्यवतींचं भारीपण दिसून आलं आहे. फु बाई फु म्हणत हसऱ्या श्रावणाचं स्वागत महिला मंडळाने केलं आहे.

Aug 25, 2023, 05:45 PM IST

नागपुरात मनसे कार्यकर्त्यांची अ‍ॅमेझॉन कार्यालयात तोडफोड, पाकिस्तानी झेंड्याच्या ऑनलाईन विक्रीचा आरोप

मनसे कार्यकर्त्यांनी नागूपरमधल्या अॅमेझोनच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. अॅमेझॉनवरुन पाकिस्तानच्या झेंड्यांची ऑनलाईन विक्रि केली जात असल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्ते कार्यालयात धडकले आणि त्यांनी तोडफो़ड सुरु केली. 

Aug 22, 2023, 02:10 PM IST

'आती क्या?' बसची वाट पाहणाऱ्या महिलांना वेश्या व्यवसायासाठी विचारणा; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Crime : पुण्यातील कात्रज भागात हा सगळा प्रकार सुरु असून यामुळे स्थानिक महिला त्रस्त आहेत. या महिलांनी मनसे नेते वसंत मोरे यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मोरे यांनी लॉजमध्ये जाऊन निवेदन देऊन सगळा प्रकार थांबवण्यास सांगितले आहे.

Aug 22, 2023, 09:28 AM IST
MNS Sandeep Deshpande On Amit Thackeay Yatra For Pending Mumbai Goa Highway work PT1M23S

'राज्यात जेवढे मनसेचे कार्यकर्ते तेवढेच रस्त्यावर खड्डे' मनसेच्या खळ्ळ खट्याकवरुन दीपाली सय्यदचा टोला

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून मनसे प्रचंड आक्रमक झालीय. राज ठाकरेंच्या दौ-यानंतर मनसेनं ठिकठिकाणी खळ्ळंखट्याक सुरू केलंय. संतप्त कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी तोडफोडही केलीय. यावरुन शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं आहे. 

Aug 19, 2023, 01:45 PM IST

MU Senet Election: राजकारणातले दोन ठाकरे एकत्र मैदानात? सिनेट निवडणुकांवरून राजकारण तापलं!

Mumbai University Stayed Senate Graduate Election:  मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या चर्चा आहे ती ठाकरे बंधुंची...

Aug 18, 2023, 10:19 PM IST

सिनेट निवडणुकीवरून राजकारण! विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे? मनसे आक्रमक

Senate Election : सिनेट निवडणुक स्थगितकेल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे नेते  आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि भाजपवर टीका केली आहेत तर आता मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय असल्याचं पत्रच मनसेने राज्यपालांना लिहिलंय.

 

Aug 18, 2023, 02:08 PM IST

ज्यांच्यासाठी आंदोलन करतोय त्यांना त्रास होऊ नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी यावरुन प्रशासनाला धारेवर धरलं आहे. तसंच सतत त्यांनाच निवडून देणाऱ्या लोकांचीही ही चूक असल्याचं म्हटलं आहे. पुण्यात पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्धाटनादरम्यान ते बोलत होते. 

 

Aug 18, 2023, 12:07 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मनसे 3 लोकसभा जागा लढवणार? जाणून घ्या अपडेट

Maharashtra Navnirman Sena: 2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्याने राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, राष्ट्रवादी अशा सर्वांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मनसे स्वबळाचा नारा देत रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Aug 18, 2023, 11:18 AM IST

राज ठाकरे म्हणाले 'सरकारला धडकी भरली पाहिजे', कार्यकर्त्याने सुरु होण्याआधीच टोलनाका फोडला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा असं आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाका फोडला आहे

 

Aug 17, 2023, 08:24 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पेटणार, राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेकडून तोडफोड

चंद्रापर्यंत यान जाऊ शकतं मग खड्डे बुजवून रस्ता का बांधता येत नाही मनसे अध्यश्र राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल, कोकणवासियांची जमीन विक्रीमध्येही फसवणूक होत असल्याचा आरोप. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असन माणगावमध्ये तोडफोड करण्यात आली आहे.

Aug 16, 2023, 05:39 PM IST