MNS for Loksabha Election : पुढील वर्ष म्हणजे 2024 हे निवडणुकीचं वर्ष आहे. पुढच्या वर्षात लोकसभा निवडणूक होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेंबांधणी सुरु केली आहे. भाजपप्रणित एनडीए (NDA) आणि विरोधकांच्या इंडिया (INDIA) आघाडीमध्ये प्रमुख लढत असणार आहे. भाजपने (BJP) महाराष्ट्रात मिशन 45+ हाती घेतलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही (MNS) जोरदार तयारी सुरु केली आहे. 2019 लोकसभा निवडणूक मनसेने लढवली नव्हती. पण 2024 लोकसभा निवडणूक लढवण्याचं मनसे लढवणार असल्याचं जवळपा निश्चित मानलं जातंय. राज ठाकरे यांनी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनेक लोकसभा मतदारसंघात मनसेकडून चाचपणी सुरु करण्यात आली आहे.
मनसेकडून चाचपणी सुरु
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी केली जातेय. लोकसभा निहाय मनसेच्या बैठकांच सत्र सध्या सुरू आहे.मनसे नेते आणि सरचिटणीस यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून लोकसभा निहाय जबाबदाऱ्या देखील देण्यात आलेल्या आहेत. लोकसभा निवडणुका पूर्वी इतर कुठल्याही निवडणुका होतील असं वाटत नाही असं स्पष्ट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना सांगितलेला आहे.त्यामुळे मनसेचा भर सध्या लोकसभा निवडणुकीवर आहे. प्रत्येक मतदार संघात जाऊन मनसेकडून चाचपणी सुरू आहे. त्यामुळेच मनसेच्या संभाव्य उमेदवारांची नाव सध्या चर्चेत आहेत.
मनसेचे संभाव्य उमेदवार
कल्याण लोकसभा - राजू पाटील
ठाणे लोकसभा - अभिजित पानसे / अविनाश जाधव
पुणे लोकसभा - वसंत मोरे
दक्षिण मुंबई लोकसभा - बाळा नांदगावकर
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा-नितीन सरदेसाई
ईशान्य मुंबई लोकसभा-संदीप देशपांडे
उत्तर मुंबई लोकसभा- अविनाश अभ्यंकर
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा -शालिनी ठाकरे
नाशिक लोकसभा-डॉ. प्रदीप पवार/दिलीप दातिर
संभाजी नगर लोकसभा - प्रकाश महाजन
सोलापूर लोकसभा - दिलीप धोत्रे
चंद्रपूर लोकसभा - राजू उंबरकर
रायगड लोकसभा - वैभव खेडेकर
पुण्यात भावी खासदारचे पोस्टर्स
मनसेच्या संभाव्य उमेदावारांची चर्चा सुरु असाताना पुण्यात मनसेचे वसंत मोरे यांचे थेट भावी खासदार म्हणून पोस्टर झळकले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू होती. काही दिवसापूर्वी वसंत मोरे यांनी बारामतीच्या गडाला सुरुंग लावू असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पुणे शहरात वसंत मोरे समर्थकांनी भावी खासदार म्हणून पोस्टर लावले. मनसेकडून लोकसभेची तयारी केली जात असतानाच मनसेचा उमेदवार कोण असेल हे सांगण्याची गरज नाही, असं पुण्यात बोललं जात आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत वसंत मोरे यांनी तब्बल 34 हजार 809 मतं मिळवली होती. मोरेंच्या या झंजावाताचा फटका भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांना बसला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
लोकसभा निहाय मनसेच्या कुठल्या नेत्याकडे कुठली जबाबदारी ?
मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे पुण्याची जबाबदारी, मनसे नेते बाबू वागस्कर यांच्याकडे शिरूर लोकसभेची जबाबदारी, मनसे सरचिटणीस वसंत मोरे यांच्याकडे बारामतीची जबाबदारी, मनसे सरचिटणीस अमेय खोपकर यांच्याकडे मावळची जबाबदारी, मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्याकडे छत्रपती संभाजी नगरची जबाबदारी, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याकडे रायगड लोकसभेची जबाबदारी, मनसे सरचिटणीस किशोर शिंदे यांच्याकडे नाशिक लोकसभेची जबाबदारी, मनसेचे आमदार राजू पाटील यांच्याकडे कल्याण लोकसभेची जबाबदारी, मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडे ठाणे पालघर भिवंडी ग्रामीणची जबाबदारी, मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्याकडे दक्षिण मुंबई लोकसभेची जबाबदारी, मनसे नेते नितीन सरदेसाई,अमित ठाकरे, संदीप देशपांडे यांच्याकडे दक्षिण मध्य मुंबई जबाबदारी देण्यात आली आहे, मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्याकडे उत्तर मुंबई जबाबदारी देण्यात आली आहे, मनसे नेते शिरीष सावंत यांच्याकडे ईशान्य मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे, मनसे सरचिटणीस योगेश परुळेकर,शालिनी ठाकरे, संदीप दळवी यांच्याकडे उत्तर पश्चिमची जबाबदारी देण्यात आली आहे.