maharashtra

एक होतं इरसालवाडी... एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आणणारी भयानक दुर्घटना

कुणाचा मुलगा, मुलगी, कुणाची सून ,कुणाची आई, तर कुणाचं लेकरु ढिगा-याखाली गाडले  गेले. काळरात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात अनेकांचं जगणं संपलं आणि जे वाचले  त्यांच्या जगण्याचा अक्षरशः चिखल झाला आहे.  

Jul 20, 2023, 11:04 PM IST

दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, कोयता, चाकूने मित्रांनीच काका-पुतण्याला संपवलं

यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरु झालेल्या वादातून पाच ते सहा जणांनी मित्र आणि त्याच्या काकांवर कोयता आणि चाकूने हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Jul 20, 2023, 09:17 PM IST

मृत्यूच्या कुशीतली गावं! राज्यातील एक हजार गावांवर मृत्यूची टांगती तलवार, धक्कादायक अहवाल

इरसालवाडीत दरड कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आलीय. महाराष्ट्रातल्या तब्बल एक हजार गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्याची बाब समोर आलीय.  ही गावं कोणती आणि दुर्घटना टाळण्यासाठी सरकार काय करतंय याचा घेतलेला हा आढावा

Jul 20, 2023, 08:41 PM IST

इरसालवाडी ढिगाऱ्याखाली; बचावकार्य सुरु असतानाच अग्निशमन दलाच्या जवानावर ओढावला मृत्यू

रायगडः मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील बहुंताश भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. बुधवारी रात्री रायगडमधील इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडी या अदिवासी वस्तीवर असणाऱ्या पाड्यावर दरड कोसळले. पूर्ण गाव झोपेत असतानाच गावावर दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण गावच मलब्याखाली दबले गेले आहे. जवळपास 120पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत पाच ते सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, २७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र हे बाचवकार्य सुरु असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानावर मृत्यू ओढावला आहे. 

Jul 20, 2023, 05:42 PM IST

नीलम गोऱ्हे उपसभापतीपदावर कायम राहणार, विरोधकांना धक्का... पाहा कायदा काय सांगतो?

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर महाविकास आघाडीने नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवण्याची राज्यपालांकडे मागणी केली होती. यावरुन अधिवेशवात विरोधकांनी गोंधळही घातला. पण विरोधकांच्या या मागणीला धक्का बसला आहे. 

Jul 20, 2023, 05:26 PM IST

चक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद

Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले. 

Jul 20, 2023, 03:20 PM IST

मुसळधार पावसामुळं हाहाकार; रायगडमध्ये दरड कोसळली, पिंपरीत रस्ता खचला, भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला...

Maharashtra Rain Updates: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दैना उडवलीय. रायगडच्या इरसालवाडी गावावर दरड कोसळून दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय. तर पिपंरीत रस्ता खचण्याची घटना घडली आहे. भाईंदरमध्ये मुसळधार पावसाने इमारतीचा भाग कोसळला

Jul 20, 2023, 02:12 PM IST

फडणवीस-अजित पवारांच्या वाढदिवसाचं स्नेहभोजन रद्द; इरसालवाडीतील पीडितांना मदतीचं आवाहन

Fadnavis Ajit Pawar Birthday Dinner Party Cancelled: राज्याला पहिल्यांदाच 2 उपमुख्यमंत्री मिळाले असून या दोघांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने एक योगायोग जुळून आला आहे. या दोघांसाठीही एका विशेष पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी सर्व सत्ताधारी आमदारांना आमंत्रित करण्यात आलेलं.

Jul 20, 2023, 01:46 PM IST

इरसालवाडी ढिगाऱ्याखाली जाण्याआधी काय घडलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम

Irsalwadi Landslide : इरसालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या या इरसालवाडीत मोठी दुर्घटना घडलीय.गावातील 25 ते 28 घरे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत 10 जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत.

Jul 20, 2023, 01:03 PM IST

Khalapur Irshalgad Landslide : दरड का कोसळते? जाणून घ्या यामागचं मुख्य कारण

Khalapur Irshalgad Landslide : कर्जतमध्ये असणाऱ्या इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरसालवाडी या लहानशा गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली. आणि त्यामागचं कारण शोधण्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित झाले. 

 

Jul 20, 2023, 12:14 PM IST