Khalapur Irshalgad Landslide : दरड का कोसळते? जाणून घ्या यामागचं मुख्य कारण

Khalapur Irshalgad Landslide : कर्जतमध्ये असणाऱ्या इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरसालवाडी या लहानशा गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली. आणि त्यामागचं कारण शोधण्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित झाले.   

सायली पाटील | Updated: Jul 20, 2023, 12:14 PM IST
Khalapur Irshalgad Landslide : दरड का कोसळते? जाणून घ्या यामागचं मुख्य कारण  title=
Khalapur irshalwadi Landslide reason behind why land slide happens

Khalapur Irshalgad Landslide : रायगड (Raigad) जिल्ह्यातील कर्जमध्ये असणाऱ्या इरसालवाडीमध्ये काळाचचा डोंगर बुधवारी रात्री कोसळला आणि क्षणातच होत्याचं नव्हतं. झालं. भयंकर आवाज झाला आणि आम्ही गावातून जीव मुठीत घेऊन पळ काढला, अशी प्रतिक्रिया इरसालवाडीतील प्रत्यक्षदर्शींनी दिली आणि दरड कोसळताना नेमकी काय परिस्थिती ओढावली असेल या विचारानं काळजावर घाव घातला. 

ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती या दुर्घटनेतून बचावलेल्यांनी दिली. ज्यानंतर दरड नेमकी कशी कोसळली, हे क्षेत्र दरड प्रवण भागता येतं का? असे अनेक प्रश्न विचारले गेले. निसर्गाचा प्रकोप म्हणून या दरडींकडे आणि भूस्खलनाच्या घटनांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण होताना दिसत आहे. 

दरडी का कोसळतात? 

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दरड कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही. घाटमाथ्यावर आणि कोकण पट्ट्यामध्ये या दिवसांमध्ये अनेकदा भूस्खलन, दरडी कोसळल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्यामुळं अनेकांनी जीव गमावला आहे, गावंच्या गावं उध्वस्तही झाली आहेत. पण, दरड म्हणजे काय? 

दरड म्हणजे एखाद्या टेकडी किंवा डोंगराता उतावरील तीव्र कडा. डोंगर भेदून रेल्वे रुळ, बोगदा, घाटातील रस्ते तयार करताना असे अनेक उतार तयार होतात. काही ठिकाणी हे तीव्र उतार नैसर्गिक पद्धतीनं तयार होतात. भूस्खलन होतं त्यावेळी दरड नैसर्गिकरित्या कोसळते. सोप्या भाषेत सांगावं तर, मोठा मातीचा ढीक किंवा खडक तुटून कडा कोसळतो आणि दरड कोसळते. 

दगड किंवा मोठमोठ्या पाषाणांमध्ये नैसर्गिकरित्या काही भेगा असतात. ऋतू आणि हवामान बदलांमुळं ऊन, वारा आणि पावसाचा मारा या खडकांवर होतो आणि कालांतरानं त्यांचे तुकडे होण्यास सुरुवात होते. परिणामी त्यांच्यामध्ये असणाऱ्या भेगा मोठ्या होत जातात. त्यातच या रुंदावलेल्या भेगांमध्ये पाणी साचतं आणि भूभागासोबतच दगडाचं वजन वाढून तो उताराच्या दिशेनं सरकू लागतो. पाहता पाहता एक मोठा भूभाग सरकतो आणि प्रचंड वेगानं खाली येतो. या प्रक्रियेला दरड कोसळणं म्हटलं जातं. 

हेसुद्धा पाहा : Irshalgad : ट्रेकर्सची पहिली पसंती असणारा हा इरसालगड नेमका आहे तरी कुठे?

दरड कोसळण्याची घटना हल्लीच्या दिवसांमध्ये काही मानवनिर्मित कामांमुळं घडताना दिसते. उदारहणार्थ रेल्वे मार्ग, रस्ते आणि तत्समकारणांसाठी मोठ्या ताकदीच्या यंत्रांचा वापर केला जातो. ज्यामुळं दुतर्फा दरडी तयार होताना त्यामध्ये असणाऱ्या माती, दगड, पाषाणांमध्ये भेगा पडतात आणि त्यांमध्ये पाणी मुरण्यास सुरुवात होते. सरतेशेवटी पावसाळ्यात पाण्याचा मारा वाढतो आणि दरडी कोसळणअयास सुरुवात होते. त्यामुळं आता राज्यातील दरडप्रवण क्षेत्रांनी पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढवल्याचं स्पष्ट होत आहे.