maharashtra news

Weather Update : कोकणात बरसणार पाऊसधारा, राज्याच्या 'या' भागात मात्र हुडहूडी

Weather Update : राज्यात थंडीची सुरुवात झाली, असं म्हणत असतानाच पुन्हा एकदा हवामानात बदल झाले आहेत. अचानकच कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 

 

Nov 6, 2023, 07:30 AM IST

Maratha Reservation : मनोज जरांगे यांचा राज्यव्यापी दौरा! दगा फटका झाल्यास जरांगेंचा 'प्लॅन बी' काय?

Manoj Jarange Patil : येत्या एक तारखेपासून गावागावात साखळी उपोषण सुरू होईल. ज्या गावात आधीपासून आहे तिथे राहीलच आणि नव्याने गावांचा समावेश होईल असेही जरांगे पाटील म्हणाले.

Nov 5, 2023, 09:16 PM IST

दुष्काळात 13वा महिना! विक्रीसाठे ठेवलेले साडेपाच लाखांचे कांदे चोरट्यांनी लांबवले

Nadurbar Crime : आधीच दुष्काळाच्या झळा सहन करत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता चोरट्यांनी शेतमाल चोरीकडे आपला मोर्चा वळवला आहे, त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.

Nov 5, 2023, 02:19 PM IST

'उद्याची सकाळ बघा कशी करतो; दिवाळीच्या तोंडावर सदावर्तेंकडून एसटी संपाची हाक

ST Workers Strike : ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील संघटनेने सोमवार, उद्यापासून संपाची हाक दिली आहे.

Nov 5, 2023, 01:40 PM IST

'माझ्या लेकानं डोळ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं'; अजित पवार यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा

Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनांकडून अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा सातत्याने व्यक्त केली जात आहे. अशातच अजित पवार यांच्या मातोश्री यांनीही मुलगा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Nov 5, 2023, 08:46 AM IST

2 हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकींचा धुरळा; राज्यभरात मतदानाला सुरुवात

Gram Panchayat Elections : राज्यभरातील २ हजार 353 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रियेअंतर्गत आज मतदान पार पडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने यासाठी पूर्णपणे तयारी केली आहे.  यामध्ये 2 हजार 950 सदस्य तर 130 सरपंच्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या ग्रामीण भागातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Nov 5, 2023, 08:09 AM IST

'मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर' याबातमीवर विद्यापीठाचा खुलासा

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार उघडकीस आला आहे. दुरस्त व अध्ययन शिक्षण संस्था (आयडॉल) च्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका झेरॉक्ससाठी चक्क सार्वजनिक झेरॉक्स सेंटरवर असल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती मिळाली होती. यावर आता मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाकडून खुलासा सादर करण्यात आला आहे. 

Nov 5, 2023, 07:12 AM IST

आता एससीच्या विद्यार्थ्यांना द्यावं लागणार ‘नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र’; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Non Creamy Layer Certificate : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाची निर्णय घेतला आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे.

Nov 4, 2023, 08:52 AM IST

Weather Update : विकेंड गाजवणार गुलाबी थंडी; 'इथं' मात्र पाऊस ठरणार न बोलवताच आलेला पाहुणा

Weather Update : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच राज्यातही वातावरणात काही बदल घडून आल्याचं पाहायला मिळालं आहे. मुख्य म्हणजे ऑक्टोबर हिट मोठ्या फरकानं कमी होताना दिसत आहे. 

 

Nov 4, 2023, 08:40 AM IST

'दुष्काळ जाहीर करताना सरकारचं राजकारण? 40 पैकी 35 तालुके सत्ताधारी आमदारांचे'

Maharashtra Drought : राज्यातल्या 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पण यावरुन आता राजकारण पेटलं आहे. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना असल्याची टीका केली आहे. 

Nov 3, 2023, 04:52 PM IST

इलेक्शन ड्युटी अर्धवट सोडून शिक्षक गायब; कलेक्टरला म्हणतो, 'बायको नसल्याने रात्री...'

Teacher Election Duty: जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला शिक्षकाने दिलेले उत्तर खूप हास्यास्पद, निष्काळजी आणि तितकेच चिड आणणारे होते.

Nov 3, 2023, 03:33 PM IST

तुमचंही नाव मनोज असेल तर महाराष्ट्रातील 'या' हॉटेलमध्ये मिळेल खास ऑफर

मनोज नाव असणाऱ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेलमध्ये खास ऑफर ठेवण्यात आली आहे. मनोज नाव असणाऱ्यांना आधारकार्ड दाखवून ही ऑफर मिळणार आहे. 15 नोव्हेंबर पर्यंत ही ऑफर लागू राहणार आहे.

Nov 3, 2023, 01:39 PM IST

कोणत्या सापाच्या विषापासून बनते अ‍ॅण्टी वेनम? कुठे आढळतो? जाणून घ्या

Anti Venom Snack: किंग कोब्रा कोब्रापेक्षा जास्त विषारी आहे. पण असे असूनही, कोब्रा चावल्यामुळे भारतात सर्वाधिक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत

Nov 3, 2023, 12:28 PM IST

24 डिसेंबर की 2 जानेवारी? सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत जरांगेंचे स्पष्टीकरण

Manoj Jarange Patil : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 2 जानेवारी उल्लेख केल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 3, 2023, 10:10 AM IST

मुंबई विद्यापीठाचा पेपर आपल्या हाती! परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका अन् उत्तरे विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर

Mumbai University : मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या टी.वाय.बी.कॉमच्या परीक्षेचा पेपर एका विद्यार्थ्याच्या मोबाईलवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Nov 3, 2023, 08:28 AM IST