maharashtra government

... तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा मुलुंड प्रकरणावरुन इशारा; सरकारलाही सुनावलं

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मराठी भाषिकांनाच बाहेरचे असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. मुलुंडमध्ये घडलेल्या प्रकारानंतर सर्वच स्तरातून आता प्रतिक्रिया येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता या प्रकरणावर भाष्य केले आहे.

Sep 29, 2023, 11:58 AM IST

शासकीय कंत्राटी भर्तीचा GR निघाला; तब्बल 85 संवर्गातील रिक्त पदे भरणार

Government Kantrati Bharti: शासकीय कंत्राटी भर्ती सर्वांसाठी खुली असणार आहे. कोणताही उमेदवार यासाठी अर्ज करु शकतो. तसेच यासाठी कोणतेही आरक्षण लागू नसेल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांना सरळ कंञाटी कामगार बनण्याची संधी मिळणार आहे. 

Sep 11, 2023, 10:56 AM IST

भर पावसात महिलांनी स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा

मराठा आरक्षणासाठी जालन्यात सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दहावा दिवस आहे. जोपर्यंत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. दुसरीकडे जरांगे यांना राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतआहे. 

Sep 8, 2023, 07:25 PM IST

मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय; GR काढणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maratha Reservation Case: मराठा समाजाच्या आरक्षणबाबत कॅबिनेचत बैठकीत मोठा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.  

Sep 6, 2023, 07:29 PM IST

नवा नियम! वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा विचारच सोडा, नाहीतर शिक्षा भोगा...

Maharashtra News: वाहनधारकांसाठी किंवा भविष्यात वाहन खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. लक्षात ठेवा नाहीतर मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागेल. 

 

Aug 31, 2023, 11:12 AM IST

'ते' बनावट पत्र सहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलंच कसं? 10 कोटींची फसवणूक करणाऱ्या हबीब शेखचा प्रताप उघडकीस

Palghar News : खासदार राजेंद्र गावित यांच्या तक्रारीनंतर जव्हार अर्बन बँकेचे चेअरमन हबीब शेख यांना अटक शनिवारी अटक करण्यात आली आहे. हबीब शेख यांना शासनाची दहा कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Aug 21, 2023, 10:01 AM IST

'वर्षभरापासून मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, पण आम्हाला ग्रँड मास्टर म्हणतात'

आम्ही क्रांती केली ते पाहून आम्हाला 'ग्रँड मास्टर' म्हणतात असं म्हणज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. गेल्या एक वर्षापासून अनेक जण चेकमेट करण्यासाठी अनेक जण करत आहे. मात्र त्यांचं स्वप्न साकार होत नाही अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. 

Aug 16, 2023, 03:02 PM IST

5000 कोटींची गुंतवणूक, 4500 नोकऱ्या... तळेगावमध्ये Hyundai उभारणार कारखाना

Hyundai To Invest Rs 5000 Crore In Talegaon Plant: हा प्रकल्प राज्यात यावा यासाठी राज्य सरकारने हलचाली सुरु केल्या असून शिंदे सरकारमधील 2 महत्त्वाच्या मंत्र्यांनी या कंपनीच्या कारखान्याला भेट देऊन प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे. हा करार व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे.

Aug 16, 2023, 11:35 AM IST

यालाच स्वातंत्र्य म्हणतात का? मानवी साखळी करत नदीच्या पाण्यातून मृतदेह नेण्याची वेळ... आदिवासींची व्यथा

देशाने गेल्यावर्षी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आता मोठ्या उत्साहात 76 वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा होईल. पण या 76 वर्षात आदिवासी आणि गोरगरीब समाजाला खरंच स्वातंत्र्य मिळालं आहे का?  अलिशान वैभव सोडा, सध्या मुलभूत सुविधा तरी यांच्यापर्यंत पोहचल्या आहेत का?

 

Aug 14, 2023, 06:32 PM IST

मुंबईकरांचा प्रवास आता सुखाचा होणार, आता थेट विरारपर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल मार्ग..

Mumbai Metro to Reach Virar: वसई-विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवास लवकरच सुखाचा होणार आहे. लवकरच विरारपर्यंत मेट्रो सुरू होत आहे. 

Aug 7, 2023, 10:56 AM IST

Maharashtra Monsoon Session 2023 : 'सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही'; पूरस्थितीवरुन मुख्यमंत्र्यांचे निवेदन

Maharashtra Monsoon Session 2023 Live : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील शेवटच्या दिवसाचे कामकाज सुरु झाले आहे. दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

Jul 28, 2023, 11:11 AM IST

रुग्णालयात अत्यल्प दरात मिळणार औषधे, 'या' 14 जिल्ह्यात जेनरिक मेडिकल सुरु करण्याचा निर्णय

Generic Medical in Government Hospital: राज्यातील सरकारी रुग्णालयात जेनेरिक मेडिकल सुरु होणार आहेत. याद्वारे रुग्णांना अत्यल्प दरात औषधे मिळणार आहेत. रुग्णांना परवडणारी औषधे मिळावीत यासाठी केंद्र सरकारने जेनरिक मेडिकलचा पर्याय समोर आणला. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही सुविधा होती. आता या सुविधेचा आवाका वाढविण्यात आला आहे.

Jul 25, 2023, 07:02 PM IST

Maharashtra Monsoon Session 2023 Live : विरोधी पक्षनेत्याशिवाय पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा; काँग्रेस हायकमांडकडून अद्याप निर्णय नाही

Maharashtra Assembly Monsoon Session 2023 Live : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होत आहे.

Jul 24, 2023, 10:49 AM IST