नवा नियम! वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा विचारच सोडा, नाहीतर शिक्षा भोगा...

Maharashtra News: वाहनधारकांसाठी किंवा भविष्यात वाहन खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. लक्षात ठेवा नाहीतर मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागेल.   

सायली पाटील | Updated: Aug 31, 2023, 11:12 AM IST
नवा नियम! वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावण्याचा विचारच सोडा, नाहीतर शिक्षा भोगा... title=
Maharashtra authorities might impose high security numbre plate to all vehicles from 2024

Maharashtra News: रस्त्यानं प्रवास करत असताना आपली नजर नकळतच इतर वाहनांवर जाते आणि त्या वाहनांमध्ये किमान अशी एक गोष्ट तरी नक्कीच आढळते जी आपलं लक्ष वेधते. आपण वळून वळून तीच गोष्ट पाहत असतो. प्रवास शहरातील असो किंवा खेड्यातील. आपलं हे निरीक्षण सुरुच राहतं. फक्त नजरेत पडणाऱ्या गोष्टी प्रांताप्रांतानुसार बदलतात. याच नजरेस पडणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे वाहनं आणि त्यांच्यावर असणाऱ्या नंबर प्लेट. 

शहरांमध्ये वाहनाची नंबर प्लेट म्हटलं की त्यावर आरटीओ पासिंग क्रमांक, ठराविक राज्याची आद्याक्षरं असणारा कोड आणि इतर तपशील आकड्यांच्या स्वरुपात आढळतो. वाहन क्रमांक यामध्ये सर्वाधित महत्त्वाचा असतो. हीच नंबर प्लेट गावाकडच्या भागांमध्ये मात्र बऱ्याच वेगळ्या पद्धतीत समोर येते. किंबहुना काही नंबर प्लेट तर इतक्या सजवलेल्या असतात की, त्या वाहनाची मालकी असणाऱ्यांच्या स्वभावाचा अंदाजही आपण लावू लागतो. 

अर्थात हा झाला गमतीचा भाग. पण, ग्रामीण भाग किंवा मग हल्ली हल्ली शहरातील काही अपवादाची उदाहरणं असणारे वाहन मालकही त्यांच्या वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये आई, दादा, पप्पा, बॉस असे शब्द लिहीत त्यातून वाहनाचा क्रमांकही दर्शवतात. आता मात्र हे शब्द आणि त्यातून दाखवले जाणारे आकडे भूतकाळाचा भाग होणार आहेत. 

सावध व्हा असं काही तुम्ही करूच नका... 

पाहताना या नंबर प्लेट कितीही लक्षवेधी वाटल्या तरीही कायद्याला मात्र ही कलात्मकता रुचलेली दिसत नाही. म्हणूनच की काय, महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व वाहनांवर उच्चस्तरीय सुरक्षा नोंदणीक्रमांक असणारी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेण्यासाठीच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. 

हेसुद्धा वाचा : महागाईची पर्वा न करता SBI देतेय सर्वात स्वस्त Home Loan, आज शेवटची संधी 

महाराष्ट्र मोटर वाहन विभागानं (Maharashtra Motor Vehicles Department) एप्रिल 2019 च्या धी राज्यात नोंदणी करण्यात आलेल्या वाहनांवर एचएसआरपी लावण्यासाठीचे प्रस्ताव मागवले. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे केंद्राकडून देशात 1 एप्रिल 2019 पासून नोंदणी करण्यात आलेल्या वाहनांवर एचएसआरपी बंधनकारक केला होता. महाराष्ट्रात आता सदरील कामासाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती केल्यानंतर साधारण 12 महिन्यांमध्ये सर्व वाहनांवर ही उच्चस्तरीय सुधारित नंबर प्लेट असणार आहे. निर्धारित योजनेप्रमाणं सर्व गोष्टी घडल्यास पुढील वर्षी म्हणजेच 2024 पासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळं तुम्ही येत्या काळात वाहन घेणार असाल, तर त्यावर लागणाऱ्या नंबर प्लेटविषयी सविस्तर विचारपूस नक्की करा.