सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ज्या गोष्टीची वाट पाहिली जात होती तो शासकीय कंञाटी भर्तीचा जीआर अखेर निघाला आहे. यामुळे तब्बल 85 संवर्गातील शासकीय पदं ही कंञाटी कंपन्यांमार्फत थेट भरली जाणार आहेत. तब्बल 138 संवर्गातील हजारो शासकीय पदं यापुढे थेट कंञाटीपद्धतीनेच भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.शिपाई ते इंजिनीअरची विविध पदे थेट कंञाटी पद्धतीनेच पदं भरली जाणार आहेत. यासाठी 9 खासगी कंपन्यांना सरळसेवा पदांच्या भर्तीची कंञाटं दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संबंधित कंञाटी कंपन्यांना शासनाकडून रितसर कमिशन मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर कंञाटं मिळणाऱ्या कंपन्यांमध्ये काही सत्ताधारी आमदारांच्या कंपन्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. कंत्राटी भर्ती सुरळीत पार पाडावी यासाठी संबंधित खात्याचे मंञी या कंञाटी भर्तीवर लक्ष ठेवणार आहेत.
या कंञाटी शासकीय भर्ती सर्वांसाठी खुली असणार आहे. कोणताही उमेदवार यासाठी अर्ज करु शकतो. तसेच यासाठी कोणतेही आरक्षण लागू नसेल अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील हजारो तरुणांना सरळ कंञाटी कामगार बनण्याची संधी मिळणार आहे.
याआधी काढलेला कंत्राटी भर्तीचा जीआर शासनाला रद्द करावा लागला होता. दरम्यान मराठा- ओबीसी आंदोलन पेटलेलं असतानाच शासनाने कंञाटी भर्तीचा जीआर काढला आहे. आता कंत्राटी भरती साठी सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या भर्ती अंतर्गत कुशल पदांसह तब्बल 138 संवर्गातील पदं यापुढे कंञाटी पद्धतीनेच भरली जाणार आहेत.
या भर्तीसाठी कंपनीला दर महिन्याला 15% सेवा शुल्क मिळेल. कर्मचाऱअयांचे पगारदेखील कंपनीद्वारे होतील. या 9 कंपनीद्वारे राज्य शासनाचे शासकीय विभाग /निम शासकीय विभागन स्थानिक स्वराज्य संस्था/ महामंडळे/ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व इतर आस्थापन इत्यादी यांना बंधनकारक राहील, अशी माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची ही भर्ती 5 वर्षांची असणार आहे.
अतिकुशल कामगारांच्या 70 जागा भरल्या जाणार असून यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून उच्च शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार ते 2 लाख 50 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. कुशल कामगारांच्या 50 रिक्त जागा भरल्या जाणार असून उच्च शिक्षण आणि संबंधित कामाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवारांना दरमहा 25 हजार ते 60 हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.
अर्धकुशल कामगारांच्या 8 रिक्त जागा भरल्या जाणार असून उमेदवार बारावी उत्तीर्ण असावा. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 30 हजार ते 32 हजार 500 रुपयापर्यंत पगार दिला जाणार आहे. अकुशल कामगारांच्या 10 जागा भरल्या जाणार असून यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार ते 29 हजार 500 रुपयापर्यंत पगार दिला जाणार आहे.