load shedding

२०१६ पर्यंत महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त होणं अशक्य - ऊर्जामंत्री

शब्द देऊन तो पुन्हा कसा फिरवायचा याची भाजप मंत्र्यामध्ये जणू चढाओढच लागली आहे.  लागलीय. डिसेंबर २०१६ पर्यंत राज्य भारनियमन मुक्त करू असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना आता त्या आश्वसनाचाच विसर पडला आहे.   

May 11, 2015, 09:48 AM IST

महाराष्ट्रात लोडशेडींग अटळ

महाराष्ट्र 2012 पर्यंत लोडशेडींग मुक्त होणार नाही यावर आता महावितरणनंही शिक्कामोर्तब केलंय. ज्या भागातील वित्तीय हानी मोठी आहे त्यांना लोडशेडींग न करता विज देणं महावितरणला परवडणारं नाही. त्यामुळे लोडशेडींग अटळ आहे. त्यामुळे राज्य लोड शेडींग मुक्त होणार हा राज्य सरकारचा दावा फोल ठरलाय

Dec 13, 2012, 09:23 PM IST

धुळेकरांना वीजबिलाचे `धक्के`

धुळेकर नागरिक महावितरणच्या वीज बिलांमुळे वैतागले आहेत. वाढत्या महागाईत महावितरणकडून येणारी अव्वाच्या सव्वा बिलांमुळे धुळेकर मेटाकुटीला आलेत. याबाबत स्थानिकांनी महावितरणाला जाब विचारला. मात्र बिलांमध्ये काहीच दोष नसल्याचं सांगत अधिकारी तक्रारदारांना आल्या पायानं माघारी पाठवत आहेत.

Aug 17, 2012, 07:52 AM IST

शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवरील इनव्हर्टर

लोड शेडिंगच्या काळोखात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं इनव्हर्टर आता सौर ऊर्जेवर चार्ज करता येणार आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी या विषयी शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं आहे.

Jan 6, 2012, 05:47 PM IST

काँग्रेसपुढे अजितदादांचं 'लोडशेडींग'

काँग्रेसच्या टीकेला दिवाळीनंतर उत्तर देऊ असं म्हणणा-या अजितदादांनी आता काँग्रेसशी एकतर्फी शस्त्रसंधी केलीये. राज्यासमोर अनेक प्रश्न महत्वाचे आहेत असं सांगून अजित पवारांनी आपल्यावरील टीकेला उत्तर देण्याचं टाळलं आहे.

Oct 30, 2011, 09:13 AM IST

भांडवली गुंतवणूक थांबल्याने 'विजेची गोची'

अशोक पेंडसे

भारनियमनातून सु़टका करण्यासाठी एन्ऱॉंन वीज प्रकल्प आणला गेला. परंतु हा प्रकल्प बुडित गेल्याने सर्वच घोळ झाला आहे. भारनियमनातून सु़टका करण्यासाठी एन्ऱॉंन वीज प्रकल्प आणला गेला. परंतु हा प्रकल्प बुडित गेल्याने सर्वच घोळ झाला आहे.

Oct 22, 2011, 03:08 PM IST

लोडशेडिंगचा शाप, कर्मचाऱ्यांना ताप

राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे राज्याला लोडशेडिंगचा शाप मिळाला आहे. मात्र जनतेच्या रोषाचे धनी वीज मंडळाचे कर्मचारी ठरत आहेत. सामान्य जनता ही हतबल आहे तर चोर सोडून संन्यासाला फाशी का असा प्रश्न विज कर्मचा-यांना पडला आहे.

Oct 18, 2011, 07:11 AM IST

नाद करायचा नाय - अजितदादा

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी माझ्या नादाला लागू नये, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी सातारा येथील जाहीर सभेत भरला.

Oct 16, 2011, 10:52 AM IST

अजित पवारांचा फ्युज उडाला

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे माझ्या कार्यपद्धतीविषयी नाराज असतील, तर कॉंग्रेसने माझे ऊर्जामंत्री खाते काढावे, असे परखड मत उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केले.

Oct 15, 2011, 01:03 PM IST

पुण्यात पाण्याचा ‘लोड’ कमी

लोडशेडिंगचा परिणाम पुण्यात पाणीपुरवठ्यावर झाला आहे. आज कमी दाबानं पाणीपुरवठा केला गेला. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. लोडशेडिंगचा फटका पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला बसल्याने पाणी कमी दाबानं सोडावे लागलं आहे.

Oct 12, 2011, 08:24 AM IST

लोडशेडिंगचा झटका वितरण कंपनीला!

यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या भारनियमनामुळं लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर हल्ला चढवून अभियंत्याच्या कक्षाची तोडफोड केली.

Oct 11, 2011, 12:07 PM IST