मुंबई: शब्द देऊन तो पुन्हा कसा फिरवायचा याची भाजप मंत्र्यामध्ये जणू चढाओढच लागली आहे. लागलीय. डिसेंबर २०१६ पर्यंत राज्य भारनियमन मुक्त करू असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना आता त्या आश्वसनाचाच विसर पडला आहे.
२०१६ पर्यंत महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त होणं अशक्य असल्याचं ऊर्जामंत्र्यांनी जालन्यात म्हटलंय... साठ टक्के वीज बिल भरलं जात नाही तोवर संपूर्ण लोडशेडिंगमुक्ती शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
दुसरीकडे आपलंच खातं शेतकरी आत्महत्यांसाठी जबाबदर असल्याचंही बावनकुळे म्हणतायेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.