काँग्रेसपुढे अजितदादांचं 'लोडशेडींग'

काँग्रेसच्या टीकेला दिवाळीनंतर उत्तर देऊ असं म्हणणा-या अजितदादांनी आता काँग्रेसशी एकतर्फी शस्त्रसंधी केलीये. राज्यासमोर अनेक प्रश्न महत्वाचे आहेत असं सांगून अजित पवारांनी आपल्यावरील टीकेला उत्तर देण्याचं टाळलं आहे.

Updated: Oct 30, 2011, 09:13 AM IST

कैलास पुरी, 

झी २४ तास वेब टीम,  पुणे
काँग्रेसच्या टीकेला दिवाळीनंतर उत्तर देऊ असं म्हणणा-या अजितदादांनी आता काँग्रेसशी एकतर्फी शस्त्रसंधी केलीये. राज्यासमोर अनेक प्रश्न महत्वाचे आहेत असं सांगून अजित पवारांनी आपल्यावरील टीकेला उत्तर देण्याचं टाळलं आहे. माणिकराव ठाकरे आणि नारायण राणेंनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावर दिवाळीनंतर आपण फटाके फोडू असं अजितदादांनी म्हटलं होतं. मात्र आता अजितदादांनी बॅकफूटवर जात हा प्रश्न एवढा महत्वाचा नसल्याचं म्हटलं आहे.

लोडशेडिंगच्या प्रश्नावर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला दिवाळीनंतर उत्तर देऊ म्हणणा-या अजित पवारांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. राज्यात इतरही काही महत्त्वाचे प्रश्न असल्याचं आता त्यांनी म्हटलं आहे.

कार्यकर्त्यांना नेहमीच 'अरे ला का रे' म्हणून उत्तर द्या असा सल्ला देणाऱ्या अजितदादांनी मवाळ भूमिका घेण्यामागे नक्की राजकारण तरी काय याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.