नाठाळांचे माथी हाणू काठी
लालबागच्या राजाच्या दरबारात भक्तांवर मंडळाच्या कार्यकर्त्यांची अरेरावी धक्काबुक्कीच्या विरोधात ‘झी मीडिया’नं कुठल्याही दबावाला न झुकता वाचा फोडली आणि अनेकांनी आपल्याला आलेले अनुभव कथन केले. देवाला हाताशी धरून देवाचं मार्केटिंग करून कोट्यवधी रूपये भक्तांकडून मिळवून त्यांनाच दाबून मारण्याचा हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही, हे ‘झी २४ तास’नं ठणकावलं. सातत्यानं बातम्या दाखवल्यानंतर अखेर गृहमंत्री जागे झाले आणि कारवाईच आश्वासन दिलं. अर्थात कारवाई काय होते याकडेही आमचं लक्ष असणार आहेच.
Sep 17, 2013, 01:35 PM ISTलालबागच्या कार्यकर्त्यांची PSI ना मारहाण
लालबागच्या कार्यकर्त्यांची मुजोरी थांबायला तयार नाही. आज दुपारी लालबाग मंडळाच्या एका कार्यकर्त्याने सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पीएसआय अशोक सरमळे यांना धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय.
Sep 16, 2013, 09:46 PM ISTलालबागच्या कार्यकर्त्यांनी महिला कॉन्स्टेबलला केली मारहाण?
लालबागच्या राजाच्या मंडपात घडणा-या एकेक घटना सातत्यानं समोर येतायत. काल रात्री एका महिला कॉन्स्टेबलला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं आम्हाला समजलंय.
Sep 16, 2013, 08:29 PM ISTलालबागच्या मुजोर कार्यकर्त्यांसंदर्भात गृहमंत्र्यांच्या सूचना
झी मीडियाच्या दणक्यानंतर आता राज्यकर्त्यांना जाग आलीये. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांशी गैरवर्तन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश सहआयुक्तांना दिलेत.
Sep 16, 2013, 05:37 PM ISTलालबागचा राजा, नवसाची रांग आणि मी...
गणेशचतुर्थीचा आदला दिवस... रविवार... दुपारचा 1 वाजलेला... पण `लालबागचा राजा`च्या नवसाची रांग आमच्या शांतकिरण बिल्डिंगपर्यंत पोहोचलेली...
Sep 14, 2013, 11:37 AM IST`लालबागच्या राजा`च्या दरबारात भाविकांना धक्के!
ही एक अशी बातमी आहे, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकेल. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती मिळवणाऱ्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांशी कसं वर्तन केलं जातं, हे उघड करणारी दृश्यं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
Sep 13, 2013, 11:13 AM ISTराज्यात सर्वत्र बाप्पाच्या उत्साहाला उधाण
राज्यात सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची धूम आहे. मुंबईतर रात्रीपासून बाप्पाचा जयघोष सुरु आहे. मराठी भाषिकांचा प्रभाव असलेल्या लालबाग, चिंचपोकळी, परळ, दादर परिसरात तर उत्साहाला उधाण आलं होतं. उपनगरातही बाप्पाचं जोरदार स्वागत होतंय.
Sep 10, 2013, 07:32 AM IST