नागा चैतन्य-शोभिताच्या लग्न पत्रिकेवर हिंदू धर्माची छाप! केळ्याच्या पानापासून बनवलेल्या पत्रिकेवर गाय, समई अन्...

Naga Chaitanya- Sobhita Dhulipala Wedding Card : नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल...

दिक्षा पाटील | Updated: Nov 17, 2024, 11:23 AM IST
नागा चैतन्य-शोभिताच्या लग्न पत्रिकेवर हिंदू धर्माची छाप! केळ्याच्या पानापासून बनवलेल्या पत्रिकेवर गाय, समई अन्... title=
(Photo Credit : Social Media)

Naga Chaitanya- Sobhita Dhulipala Wedding Card : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. दोघांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सुरुवात ही गोधुमा रायी पसुपु दंचतमनं झाली. शोभिता आणि नागा चैतन्यनं त्यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यापर्यंत त्यांच्या नात्याविषयी कोणाला सांगितलं नाही. रिपोर्ट्सनुसार, हे दोघे डिसेंबर 2024 मध्ये लग्न बंधनात अडकणार आहे. नुकतीच त्यांच्या लग्न पत्रिकेची एक झलक पाहायला मिळाली. त्या पत्रिकेमुळे असं म्हटलं जातं की लग्नाचे कार्यक्रम आणि परंपरा या अनेक होतील.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या लग्नाच्या पत्रिकेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पत्रिकेवर लग्नाची 4 डिसेंबर ही तारिख दिसत आहे. त्यात नागा चैतन्य आणि शोभिता या दोघांचं नाव दिसून येत आहेत. कार्ड पेस्टल रंगाच्या पॅलेटमध्ये बनवण्यात आलं आहे. त्या पत्रिकेत पितळाची समई, घंटा, बॅकग्राऊंडला असलेलं मंदिर, केळ्याची पानं या सगळ्या गोष्टी त्या पत्रिकेत दिसून येत आहे. 

Naga Chaitanya Sobhita Dhulipala wedding card gets viral givs a Glimpse Of Indian Culture

कार्डसोबत पाहुण्यांसाठी खूप गिफ्ट्स पाठवण्यात आले. त्या गिफ्ट्सच्या बकेडटमध्ये इक्कत-मुद्रित कपडा, चमेलीची एक माळ आणि अनेक गोष्टी आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका इतकी सुंदर दिसते की त्याला पाहून एक गोष्ट स्पष्ट होते की लग्नात सगळं जास्त तामझाम न करता करण्यात आलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : धनुषनं 10 कोटींची नोटीस बजावल्यानंतर नयनताराला श्रृती हासनसहीत 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रींचा पाठिंबा

साखरपुड्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे त्यांच्या लग्नासाठी ठिकाण शोधत होते. त्याशिवाय ते परदेशात लग्न करण्यासाठी ठिकाण निवडणार असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान, त्या दोघांनाही अगदी साधं लग्न हवं असं वाटतंय. मात्र, आता असं म्हटलं जात आहे की नागा चैतन्य आणि शोभिता हे दोघे हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडियोमध्ये लग्न करु शकतात. ज्या लोकांची माहित त्यांच्यासाठी अन्नपूर्णा स्टुडियो का? तर त्याचं कारण असं आहे की नागा चैतन्यचे आजोबा अक्किनेनी नागेश्वर राव यांनी 1976 मध्ये बंजारा हिल्समध्ये 22 एकरची जागा घेतली आणि तिथेच अन्नपूर्णा स्टूडियोची स्थापना केली. त्यामुळे आता खरंच नागा चैतन्य आणि शोभिता कुठे लग्न बंधनात अडकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.