`लालबागच्या राजा`च्या दरबारात भाविकांना धक्के!

ही एक अशी बातमी आहे, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकेल. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती मिळवणाऱ्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांशी कसं वर्तन केलं जातं, हे उघड करणारी दृश्यं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 13, 2013, 12:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ही एक अशी बातमी आहे, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकेल. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती मिळवणाऱ्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांशी कसं वर्तन केलं जातं, हे उघड करणारी दृश्यं आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.
गणपती बाप्पाच्या भक्तीत सगळा देश तल्लीन आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक तासनतास रांगेत उभे राहतात. मात्र, हेच भाविक आपल्या देवाजवळ पोहचल्यावर त्यांना कशी वागणूक दिली जाते ते तुम्ही इथं पाहू शकता... मुंबईतला प्रसिद्ध, नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबाग राजाच्या दरबारातली ही दृष्यं...

या दृश्यांत मंडळाचे कार्यकर्ते भाविकांसोबत गैरवर्तन करत असल्याचं स्पष्ट दिसून येतंय. व्यवस्था ठेवताना त्यांना ना वयाचं भान राहिलेलं दिसतंय ना महिलांप्रती कुठली तमा... तासनतास भाविक बाप्पाच्या दर्शनाला रांगेत उभे राहतात. मात्र, प्रत्यक्षात दर्शनाची वेळ आल्यानंतर त्यांना अशाच वर्तवणुकीला सामोरं लागतं.
व्हिडिओ पाहा :

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.