लालबागच्या मुजोर कार्यकर्त्यांसंदर्भात गृहमंत्र्यांच्या सूचना

झी मीडियाच्या दणक्यानंतर आता राज्यकर्त्यांना जाग आलीये. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांशी गैरवर्तन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश सहआयुक्तांना दिलेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 16, 2013, 05:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
झी मीडियाच्या दणक्यानंतर आता राज्यकर्त्यांना जाग आलीये. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी लालबागच्या राजाच्या मंडपात भाविकांशी गैरवर्तन होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश सहआयुक्तांना दिलेत.
तातडीने या संदर्भात लालबागच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कडक शब्दांत समज देण्याची सूचना आर.आर. पाटील यांनी दिली आहे. यापुढे महिलाच नव्हे तर इतरही भाविकांशी गैरवर्तणूक होणार नाही, त्यांचा अपमान होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी अशी सूचना करण्यात येणार आहे. यापुढे कुठलाही भाविक दुखावला गेल्यास मंडळातील कार्यकर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
घडल्या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. एवढंच नव्हे, तर आवश्यकता भासल्यास संबंधित कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात येईल असं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.