हिमालय भाड्याने देणे आहे...
लवकर खाजगी कंपन्यांना हिमालय भाड्याने मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. टूरिझमसाठी नेपाळ सरकार सध्या या पर्यायाचा विचार करत आहे.
Mar 13, 2014, 09:01 AM ISTनिषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!
गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.
Mar 10, 2014, 08:23 PM ISTसावधान ! `भिशी` काढणाऱ्यांना आता कायद्याचा चाप
तुम्ही `भिशी` काढली आहे का? किंवा काढण्याची तयारी करत असाल तर सावधान. `भिशी` काढणाऱ्यांवर सावकारीविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिले आहे. याची माहिती विधानसभेत त्यांनी दिली.
Feb 25, 2014, 06:25 PM ISTराजे सरकारची `जिंदाल`वर मेहरबानी कशासाठी?
राजस्थानातील भिलवाडामध्ये नवीन जिंदाल यांच्या कंपनीला खाणपट्टे देण्याचं प्रकरण पुन्हा तापू लागलंय. निवडणुकीआधी भाजपनं यासंदर्भात काळी पत्रिका काढली होती.
Feb 25, 2014, 01:55 PM IST`आयपीएल`ला सुरक्षा देण्यास सरकारचा नकार
आयपीएल सीझन सातच्या सर्व मॅचेस भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुका आणि आयपीएलचं वेळापत्रक एकाच कालावधीत असल्याने, आयपीएल मॅचेसना सुरक्षा पुरवणं अशक्य असल्याचं मत गृहमंत्री सुशील कुमार शिंदेंनी व्यक्त केलंय.
Feb 21, 2014, 01:56 PM IST`आप`चे भाजप-काँग्रेसला खुले आव्हान, सरकार बनवा
दिल्लीत भाजप आणि काँग्रेसनं सरकार बनवून दाखवावं, असं आपच्या नेत्यांनी उघड आव्हान दोन्ही पक्षाला दिले आहे. त्याचवेळी भ्रष्टाचाराविरोधात देशभरात झाडू चलाओ यात्रा सुरू करणार असल्याची माहिती नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत देण्यात आली.
Feb 15, 2014, 03:27 PM ISTलतादीदींच्या घरबांधणीला सरकारचं कोर्टात आव्हान
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कोल्हापुरातील घरबांधणी योजनेला सरकारनं कोर्टात आव्हान दिलंय. मंगेशकर यांची जमीन कमाल नागरी जमीन धारणा कायद्याखाली अतिरिक्त ठरविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी तिथं घरबांधणी योजना राबविण्याचं ठरविलं. मात्र, ही योजना राबविताना त्यांनी अटी पाळल्या नसल्याचं कारण देऊन सरकारनं त्यांना नुकतीच घरविक्री करण्यास मनाई केली. या निर्णयास मंगेशकर यांनी याचिकेद्वारं आव्हान दिलं आहे.
Feb 5, 2014, 11:16 AM ISTशासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा शक्य?
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यताय.
Feb 3, 2014, 05:02 PM ISTमुंबईत समुद्रावर एअरपोर्ट बनवण्याचा विचार
महाराष्ट्र सरकारचा नवी मुंबई एअरपोर्टच्या बदल्यात समुद्रात एअरपोर्ट बनवण्याचा विचार सुरू आहे. नवी मुंबई एअरपोर्टसाठी जागा मिळवण्याची डोकेदुखी बंद करण्यासाठी, सरकारने यावर जालीम उपाय काढायचं ठरवलंय. थेट पाण्यावरच एअरपोर्ट बनवण्यासाठी सरकारने कंबर कसलीय.
Jan 29, 2014, 08:45 PM ISTदिल्लीत ‘आप’ बनवणार सरकार... मुख्यमंत्री कोण?
दिल्लीत सत्ता स्थापनेसाठी आम आदमी पार्टीकडून दिल्या गेलेल्या वेळेनुसार आजचा शेवटचा दिवस आहे. पार्टीचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी सत्ता स्थापनेसंबंधी सोमवारी निर्णय जाहीर करण्यात येईल, असं म्हटलंय.
Dec 22, 2013, 03:59 PM ISTसत्ता स्थापनेसाठी जनतेचं घेणार मत - केजरीवाल
दिल्ली निवडणुकीच्या निकालानंतर ‘आम आदमी पार्टी’नं पुन्हा एकदा जनतेचा दरवाजा ठोठावलाय. ‘आप’ आता जनतेकडे, दिल्लीमध्ये काँग्रेस किंवा भाजपसोबत सत्ता स्थापन करावी किंवा नाही, याबाबत सार्वमत घेणार आहे.
Dec 17, 2013, 04:24 PM ISTमोदींची ‘ललकार’, सरकारला धरलं धारेवर!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारवर हल्लाबोल केलाय. सीमेवर भारतीय जवान शहीद होतायेत आणि सरकार झोपेत असल्याचं टीकास्त्र मोदींनी सोडलंय. जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेल्या ‘ललकार’ रॅलीत त्यांनी ही टीका केलीय.
Dec 1, 2013, 07:25 PM IST`सरकारी बाबूंनो, राजकीय नेत्यांचे तोंडी आदेश पाळू नका`
राजकीय नेत्यांनी दिलेल्या तोंडी आदेशांची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करू नये, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी किंवा सुडापोटी वारंवार होणाऱ्या बदल्यांनाही चाप लावण्याचा प्रयत्न न्यायालयाने केला आहे.
Nov 1, 2013, 09:17 AM IST…’तो’ फ्लॅट मुख्यमंत्री सरकारला परत करणार
भक्ती पार्कमध्ये मुख्यमंत्र्यांच्या फ्लॅटमध्ये अनधिकृतरित्या भाडेकरू राहात असल्याचं वृत्त ‘डीएनए’ या इंग्रजी वृत्तपत्रासह ‘झी मीडिया’नेही दाखवलं होतं.
Oct 13, 2013, 11:30 PM IST‘उस्मानी पळाला की पळवून लावला?’
दहशतवादी अफझल उस्मानी पोलिसांच्या हातून पळून गेला, ही बाब धक्कादायक आहे. ‘पण, तो पळाला की त्याला पळवून लावलं? हे सरकारचं एक षडयंत्र आहे की काय? असा आरोप भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.
Sep 21, 2013, 04:39 PM IST