gold

खूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर!

तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचा मौसम सुरू होईल. त्यामुळं मुहूर्तांसाठी वधुपित्यांची घाई सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीनंतर सोन्याचे भाव हळूहळू घसरू लागल्यामुळं सर्वांनी आतापासूनच सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळं यंदा लग्नाचे बार आता दणक्यात उडणार आहेत.

Nov 5, 2014, 09:21 AM IST

वधुपित्यांना खुशखबर... सोनं ६०० रुपयांनी स्वस्त

तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मौसमाला सुरुवात होईल. फेब्रुवारीपर्यंत लग्नाचे बार उडतील. त्यामुळे मुहूर्त शोधण्यासाठी वधुपित्यांची लगबग सुरू झाली आहे. मुहूर्त सापडल्यानंतर बस्ता बांधण्यासाठी आणि सोनं खरेदीसाठी झुंबड उडेल. मात्र, लग्नसराईसाठी दणक्यात सोने खरेदी करणार्‍या वधुपक्षासाठी मोठी खुशखबर आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली असून वधुपित्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव घसरल्यामुळे सोने ६०० रुपयांनी उतरून २६ हजार ५०० प्रति तोळा इतके झाले आहे. 

Nov 1, 2014, 09:58 AM IST

सलग तिसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे दर!

सोन्याच्या दरांत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून येतंय... शुक्रवारीही सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात घसरली. 

Oct 25, 2014, 05:27 PM IST

भारतीयांकडे २० हजार टन सोने

 सोने आणि दागिन्यांचा मोह भारतीय नागरिकांना पुरातन काळापासून आहे. एका जागतिक सर्वेक्षणानुसार सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतात सध्या २० हजार टन सोन्याचा साठा आहे. त्याची किंमत ५,५२० अब्ज रुपये इतकी आहे.

Oct 24, 2014, 09:49 AM IST

दिवाळीत सोने-चांदी दरात घट

जागतिक बाजारातील नरमाई, दागिने निर्माते आणि किरकोळ विक्रेते यांच्याकडून असलेल्या मागणीतील घट, तसेच औद्योगिक क्षेत्राने खरेदीकडे फिरविलेली पाठ यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मंदीची चाल दिसून आली. सोने ७५ रुपयांनी उतरून २७,८५० रुपये तोळा, तर चांदी १०० रुपयांनी उतरून ३८,९०० रुपये किलो झाली. मुंबईत शुद्ध सोन्याचा भाव  २७६४० रुपये प्रति तोळा तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २५,८४३ रुपये आहे.  

Oct 23, 2014, 08:35 AM IST

चक्क सोने तस्करीला लगाम

सोन्याला जास्तच भाव आल्याने तस्करीमध्ये वाढ झाली होती. याला आता लगाम बसणार आहे. कस्टम विभागाने तस्करी रोखण्यासाठी बारीक नजर ठेवली आहे. त्यातच तस्करीमध्ये गुंतलेल्या टोळ्यांना जास्त लाभ होत नसल्याने त्यांचीही पाठ फिरु लागली आहे. 

Oct 22, 2014, 11:13 AM IST

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी सोनं लुटलं!

 

मुंबईः ‘विजयादशमी’ हा साडेतीन मुहूर्तपैकी एक मुहूर्त आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी मुंबईकरांची सराफच्या दुकानात झुंबड उडाली होती. गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा सोन्याच्या दरात कमालीची घट झालेली दिसून येते. तोळ्यामागे सोन्याचा दर 27 हजारांच्या जवळपास आहे. तर चांदी 40 हजारच्या खाली आल्यामुळे दागिन्याची देखील मागणी वाढली आहे.

 

Oct 4, 2014, 07:56 PM IST

पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी; ढसाढसा रडली सरिता देवी

आशियाई खेळांत ६० किलोग्रॅम गटात भारतीय बॉक्सर सरिता देवी आज पंचांच्या चुकीच्या निर्णयाची बळी ठरलीय. 

Oct 1, 2014, 02:14 PM IST

मेरी कोमने पटकावलं सुवर्णपदक

भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदक पटकावलं आहे. एशियाडमध्ये मेरीला पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळालं आहे. मेरी कोम दोन मुलांची आई आहे.

Oct 1, 2014, 12:09 PM IST

योगेश्वर दत्तला कुस्तीत सुवर्ण पदक

 भारताच्या योगेश्वर दत्त याने पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटात कजाकिस्तानच्या मल्लाला धुळ चारत सुवर्णपदक पटकावले आहे. 

Sep 28, 2014, 04:08 PM IST

एशियन गेम्स : भारताला दुसरे सुवर्ण पदक, तिरंदाजीत यश

 एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय तिरंदाजी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पुरुष सांघिक कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले आहे. भारतीय संघाने यजमान दक्षिण कोरिया संघाचा 227-224 असा पराभव केला.

Sep 27, 2014, 02:39 PM IST

सोन्याच्या किंमतीनं पाहिला गेल्या तीन महिन्यातला निच्चांक

अनेक महिने उंचीचा कळस गाठल्यानंतर आता सोन्यामध्ये बरीच घसरण पाहायला मिळतेय. शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत तब्बल ४४० रुपयांच्या घसरणीची नोंद झालीय. या घसरणीसहीत सोन्याच्या किंमतीनं गेल्या तीन महिन्यांतली सर्वात मोठी घसरण पाहिलीय. 

Sep 20, 2014, 12:20 PM IST

सोन्याची झळाळी नष्ट होतेय...

बहुमुल्य समजलं जाणाऱ्या सोन्याची झळाळी दिवसेंदिवस कमी होताना दिसतेय. बाजारात सोन्याची मागणी दिवसेंदिवस कमी होत जाताना दिसतेय... साहजिकच, यामुळे सोन्याची किंमतही घसरतेय. 

Sep 12, 2014, 03:56 PM IST

सोन्यानं गाठला गेल्या तीन महिन्यांतील निच्चांक

भारतीय शेअर बाजारात मंगळवारी मोठ्या घसरणीची नोंद झालीय. सेन्सेक्स 54.53 अंकांनी घसरून 27,265.32 वर तर निफ्टी 20.95 अंकांनी घसरूण 81,152.95 वर बंद झाला. 

Sep 10, 2014, 11:19 AM IST