सोन्याच्या किंमतीनं पाहिला गेल्या तीन महिन्यातला निच्चांक

अनेक महिने उंचीचा कळस गाठल्यानंतर आता सोन्यामध्ये बरीच घसरण पाहायला मिळतेय. शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत तब्बल ४४० रुपयांच्या घसरणीची नोंद झालीय. या घसरणीसहीत सोन्याच्या किंमतीनं गेल्या तीन महिन्यांतली सर्वात मोठी घसरण पाहिलीय. 

Updated: Sep 20, 2014, 12:20 PM IST
सोन्याच्या किंमतीनं पाहिला गेल्या तीन महिन्यातला निच्चांक  title=

नवी दिल्ली : अनेक महिने उंचीचा कळस गाठल्यानंतर आता सोन्यामध्ये बरीच घसरण पाहायला मिळतेय. शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत तब्बल ४४० रुपयांच्या घसरणीची नोंद झालीय. या घसरणीसहीत सोन्याच्या किंमतीनं गेल्या तीन महिन्यांतली सर्वात मोठी घसरण पाहिलीय. 

या घसरणीनंतर सोनं २७,०१० रुपये प्रति दहा ग्रॅम किंमतीवर तीन महिन्यांतील सर्वात खालच्या स्तरावर पोहचलंय. जागतिक पातळीवर पडलेला ट्रेंड पाहता स्टॉकिस्टांनी घेतलेल्या विक्रीच्या भूमिकेमुळे सोन्याच्या किंमतीत ही घसरण झालीय, असं दिसतंय. 

याशिवाय सोन्याची कमजोर मागणीमुळेही किंमतीत घसरण झालीय. चांदीच्या किंमतीतही सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालीय. चांदीची किंमत १०० रुपयांनी घसरून ४०,९०० रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर पोहचलीय. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पितृपक्ष (श्राद्ध पक्ष) सुरु असल्यामुळेही सोन्यामध्ये ही घसरण पाहायला मिळतेय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.