विराट कोहलीला 'तो' धक्का महागात पडला, ICC कडून मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

IND VS AUS 4th Test : बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली मैदानात ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय खेळाडूंशी भिडला. विराटच्या याच वागणुकीमुळे आयसीसीने त्याच्यावर मोठी कारवाई केली असून दंड देखील ठोठावला आहे. 

पुजा पवार | Updated: Dec 26, 2024, 04:47 PM IST
विराट कोहलीला 'तो' धक्का महागात पडला, ICC कडून मोठी कारवाई; नेमकं काय घडलं? title=
(Photo Credit : Social Media)

IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात गुरुवार 26 डिसेंबर पासून बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिजच्या चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली (Virat Kohli) मैदानात ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षीय खेळाडूंशी भिडला. सामन्यादरम्यान विराटने सॅम कोंस्टसला धक्का मारला ज्यामुळे त्याने वाद ओढवून घेतला आहे. विराटच्या याच वागणुकीमुळे आयसीसीने त्याच्यावर मोठी कारवाई केली असून दंड देखील ठोठावला आहे. 

नेमकं काय घडलं? 

मेलबर्न टेस्टच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची 10 वी ओव्हर सुरु असताना विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोंस्टसला धक्का दिला. त्यानंतर दोघांमध्ये मैदानात वादही झाला. तेव्हाच ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि मैदानातील अंपायरनि मध्यस्ती केली आणि वाद मिटवला. ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.12 नुसार आंतरराष्ट्रीय खेळाडू, खेळाडूचा सहाय्यक कर्मचारी, अंपायर, मॅच रेफरी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी अयोग्य आणि जाणूनबुजून शारीरिक संपर्क करणे हा लेव्हल 2 चा गुन्हा आहे. विराट कोहलीने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टने केलेले निर्बंध मान्य केल्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही.आयसीसीने कारवाई केली असून यात विराट कोहलीवर मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला असून त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.

पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा : 

मेलबर्न टेस्टचा पहिला दिवस हा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवला. बॉक्सिंग टेस्टच्या पहिल्या दिवशी 86 ओव्हर्स झाल्या असून यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स गमावून 311 धावा केल्या. तर भारताकडून सर्वाधिक 3 विकेट्स स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने घेतल्या.  ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या चारही फलंदाजांनी अर्धशतकीय कामगिरी केली. यात सॅम कोंस्टसने 60, उस्मान ख्वाजाने 57, लोबूशेनने 72 धावा तर स्टीव्ह स्मिथने नाबाद 68 धावा केल्या. ॲलेक्स कॅरीने 31 धावा केल्या. तर पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श दोन अंकी धाव संख्या करू शकले नाहीत.  टीम इंडियाकडून गोलंदाज जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या. त्याने घेतलेल्या विकेट्समध्ये उस्मान ख्वाजा, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श यांचा समावेश होता. तर आकाश दीप रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरला प्रत्येकी एक विकेट मिळाली. 

पाहा व्हिडीओ : 

भारतीय संघाची प्लेईंग 11 : 

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप