मुंबई : सोने आणि दागिन्यांचा मोह भारतीय नागरिकांना पुरातन काळापासून आहे. एका जागतिक सर्वेक्षणानुसार सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या भारतात सध्या २० हजार टन सोन्याचा साठा आहे. त्याची किंमत ५,५२० अब्ज रुपये इतकी आहे.
यातील २ हजार टन सोने देशभरातील विविध मंदिरांत साठवून ठेवलेले आहे. जगभरातील खाणींमधून प्रतिवर्षी २५०० टन सोने काढले जाते. त्यातील ३९ टक्के म्हणजे ९७५ टन सोने एकटा भारत आयात करतो. त्यापैकी ५२ टक्के सोने दागिने घडवण्यासाठी तर ३४ टक्के सोने गुंतवणुकीसाठी वापरले जाते.
भारतात रोज २.३ टन सोन्याची खरेदी नागरिक करतात.
संपूर्ण जगात सध्या १ लाख ७१ हजार ३०० टन इतका सोन्याचा साठा करण्यात आला आहे. त्याची किंमत ४.७३ लाख अब्ज रुपये इतकी आहे.
भारतातील सोन्याचा साठा जर सव्वाशे कोटी नागरिकांत समसमान वाटला तर प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला २४ ग्रॅम इतके सोने येईल. त्याची किंमत ६३ हजार रुपये इतकी होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.