इन्चॉन : भारताच्या योगेश्वर दत्त याने पुरूषांच्या ६५ किलो वजनी गटात तजाकिस्तानच्या मल्लाला धूळ चारत सुवर्णपदक पटकावले आहे.
योगेश्वरच्या या सुवर्णपदकासह भारताने चौथे सुवर्णपदक पटकावले आहे. भारताला २८ वर्षांनंतर एशियन गेम्समध्ये कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे. जालिम खान या मल्लाला नमवून योगेश्वरने ही कामगिरी केली आहे.
यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्समध्येही योगेश्वरने सुवर्ण कामगिरी केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.