gold rate

बापरे सोन्याचे भाव किती वाढले...

मुंबई शेअर बाजारात सुरूवातीला घसरण दिसत असली, तरी सोन्याचे भाव प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. 

Nov 9, 2016, 09:19 AM IST

सोने झाले स्वस्त, दिवाळीत होणार आणखी स्वस्त

सणासुदीत नेहमी सोने महाग होते पण यंदा वेगळ चित्र दिसत आहे. सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता. 

Oct 12, 2016, 04:38 PM IST

सोन्याच्या दरात मोठी घसरण

दसरा सणाच्या निमित्त सोनेखरेदीचा विचार असेल तर लगेच घाई करा कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीये.

Oct 6, 2016, 03:43 PM IST

तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता माहितीय?

तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता, हे जरी तुम्ही विसरले असले, तरी सोशल मीडियात एक फोटो व्हायरल होतोय, यात तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता हे तुम्हाला एका सेकंदात कळणार आहे. तुम्हाला हा फोटो पाहून कळलंच असेल, तुमच्या लग्नात सोन्याचा भाव काय होता?

Sep 12, 2016, 03:25 PM IST

खुशखबर ! सोन्याचे भाव घसरले

जागतिक मंदी आणि स्थानिक सराफांची कमी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 30,250 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

Jun 28, 2016, 10:18 PM IST

सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण

स्थानिक बाजारातील कमी मागणीमुळे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीमुळे सोन्यांच्या किंमतीतील घसरण कायम आहे. 

May 29, 2016, 12:58 PM IST

खुशखबर ! सोने आणि चांदीचे भाव घसरले

विदेशात सोन्याचे भाव मजबूत स्थितीत असला तरी देशात मात्र सोन्याचे भाव ४ दिवसानंतर घसरले आहे. सोनारांची सोन्याची मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर घसरले आहे.

May 2, 2016, 07:24 PM IST

सोन्याच्या वायदा भावात ४०५ रुपयांची घट, आता २९११० प्रति १० ग्रॅम

वैश्विक बाजारात कमकुवत ट्रेंडमुळे सट्टेबाजांनी आपले सौद्यात कपात केली आहे. त्यामुळे आज सोन्याच्या किंमतीत ४०५ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २९११० रुपये झाला आहे. 

Feb 22, 2016, 04:00 PM IST

सोन्या-चांदीच्या दरात वाढ

ऐन लग्नसराईच्या मोसमात मागणी वाढल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीमुळे गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. 

Jan 31, 2016, 04:00 PM IST

जानेवारीत सोन्याच्या किंमतीत घसरणीची शक्यता

नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात सोने खरेदीचा विचार असेल तर त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत होत असल्याने या महिन्यात सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव २४,७४०- २५-९१४ दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 

Jan 4, 2016, 01:18 PM IST

सोन्याच्या किंमतीत आठवड्याभरात ४७० रुपयांची घसरण

सोने खरेदीला जाताय तर थोडे थांबा. कारण अजून स्वस्त होणार आहे सोने. जागतिक बाजारातील मंदी आणि दागिन्यांच्या मागणीत घट राहिल्याने सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यात ४७० रुपयांनी घट पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रति ग्रॅम २६ हजारांवरुन घसरुन २५ हजार ५३० वर बंद झाले. तसेच 

Dec 21, 2015, 01:14 PM IST

सोन्याच्या किंमतीत पुन्हा घट

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण झालीये. नऊ वर्षानंतर प्रथमच रिझर्व्ह बँकेने ही वाढ केलीय. 

Dec 17, 2015, 01:04 PM IST

सोने आणखी स्वस्त होणार

सोने खरेदीसाठी निघाला आहात? तर आणखी थोडे दिवस थांबा. कारण सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होणार आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या घटत्या दराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरपर्यंत सोने २५ हजाराहूनही कमी होण्याची शक्यता आहे. 

Dec 4, 2015, 01:32 PM IST

सोनं खरेदी करायची लगबग, दर घसरले...

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची लगबग असते. आज सोन्याचे दर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येपेक्षा कमी झाले आहेत. आज प्रतितोळा २५ हजार ५०० रुपयांवर सोन्याचे दर आले आहेत. त्यामुळं सोनं खरेदीला वेग आलाय.

Nov 9, 2015, 11:14 AM IST

दसऱ्याच्या तोंडावर सोन्याची झळाली उतरतेय

परदेशात सोन्याच्या भावात तेजी असतांना, अलंकार घडवणारे तसेच किरकोळ विक्री सुस्त दिसत आहे.

Oct 11, 2015, 02:48 PM IST