दसऱ्याच्या तोंडावर सोन्याची झळाली उतरतेय

परदेशात सोन्याच्या भावात तेजी असतांना, अलंकार घडवणारे तसेच किरकोळ विक्री सुस्त दिसत आहे.

Updated: Oct 11, 2015, 02:48 PM IST
दसऱ्याच्या तोंडावर सोन्याची झळाली उतरतेय title=

नवी दिल्ली : परदेशात सोन्याच्या भावात तेजी असतांना, अलंकार घडवणारे तसेच किरकोळ विक्री सुस्त दिसत आहे.

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात ११० रूपयांची कपात दिसून आली. सोन्याचे भाव ११० रूपयांनी खाली आल्यानंतर सोनं २६ हजार ७०० रूपये प्रति १० ग्रॅमवर आलं आहे.

मात्र दिवाळीचा सण असल्याने नाणे बनवणाऱ्यांकडून चांदीची मागणी असल्याने चांदीच्या भावात सुधार झाला आहे.
 
सराफा व्यापाऱ्यांच्या मते सध्या आभूषण विक्रेत्यांकडून मागणी घटली आहे आणि रूपया मजबूत झाल्याने, आयातही स्वस्त झाली आहे, यामुळे काही महाग धातुंची किंमतींवर परिणाम झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.