नवी दिल्ली : सोने खरेदीसाठी निघाला आहात? तर आणखी थोडे दिवस थांबा. कारण सोन्याच्या किंमतीत आणखी घसरण होणार आहे. जागतिक बाजारातील सोन्याच्या घटत्या दराचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होत असल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरपर्यंत सोने २५ हजाराहूनही कमी होण्याची शक्यता आहे.
तसेच फेडरल रिझर्व्ह बँकेनेही व्याजदर वाढीचे संकेत दिल्याने त्याचा परिणाम सोने खरेदीवर झालाय. खरेदीच्या प्रमाणात घसरण झाल्याने देशांतर्गत बाजारात हे सोने पडून आहे. गुरुवारी सोन्याने चार महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली.
डॉलरही मजबूत झाल्याने आपसूकच सोने घसरणीवर त्याचा परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. पुढील पंधरवड्यात सोन्याचे दर प्रति तोळा २५ हजाराहूनही कमी होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.