Mahabharat Story : अर्जुनापेक्षा बलवान कर्णाचा मृत्यू कसा झाला? श्रीकृष्ण का ठरला कारण?

How did Karna die in Mahabharat War : कल्कि 2898 एडी चित्रपटामुळे आता महाभारताची स्टोरी चर्चेत आली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, अर्जुनापेक्षा बलवान कर्णाचा मृत्यू कसा झाला? याचं उत्तर पाहा

सौरभ तळेकर | Updated: Jun 29, 2024, 07:13 PM IST
Mahabharat Story : अर्जुनापेक्षा बलवान कर्णाचा मृत्यू कसा झाला? श्रीकृष्ण का ठरला कारण? title=
How did Karna die in Mahabharat War Why was Shri Krishna the reason behind story

Karna Death in Mahabharat : भारतामध्ये धार्मिक, अध्यात्मिक ग्रंथ आणि महाकाव्यांच्या यादीत येणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजे महाभारत... महाभारताच्या कथा प्रत्येकाच्या आयुष्याला कोणता ना कोणता बोध देतात. महाभारत म्हटलं की दोन अर्जुन आणि कर्ण या दोन पात्रांचा उल्लेख नेहमी आढळतो. मात्र, तुम्हाला माहितीये का? अर्जुनापेक्षा बलवान असलेल्या कर्णाचा मृत्यू हा श्रीकृष्णामुळे झाला होता. नेमकं असं काय झालं होतं? ज्यामुळे श्रीकृष्णाने स्वत:च्या हातून कर्णाचा अंत्यसंस्कार केले. चला तर मग जाणून घेऊया महाभारताची रोमांचक कथा..!

कर्ण हा पांडवांची आई कुंती आणि सूर्यदेवाचा पुत्र होता. कुंतीच्या लग्नापूर्वी कर्णाचा जन्म झाला होता. मात्र, समाजाच्या भीतीने कुंतीने कर्णाला एका पेटीत ठेवलं आणि पाण्यात सोडून दिलं. ती पेटी एका सारथीला सापडली आणि त्याने कर्णाला लहानाचं मोठं केलं. कर्णाला आयुष्यात अनेक अपमान सहन करावे लागले. त्याला कधीही सन्मान मिळाला नाही. एवढंच काय तर द्रोपदीने देखील कर्णासोबत लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे कर्णाचा पांडवांवर राग होता. दुसरीकडे कर्ण एक दानशुर राजा मानला जात होता. त्यामुळे त्याची चांगली प्रचिती होती.

श्रीकृष्णाने दानवीर कर्णाची परीक्षा घेयचं ठरवलं. कृष्णा ब्राम्हणाच्या वेशभूशेत कर्णाच्या समोर गेला आमि त्याला सोनं मागितलं.  सध्या सोने फक्त माझ्या दातांमध्ये आहे, असं कर्णाने कृष्णाला सांगितलं. तेव्हा, त्यासाठी तुझे दात तोडावे लागतील, असं कृष्णाने ब्राम्हणाच्या वेशातील कृष्णाला सांगितलं. त्यावेळी कर्णाने आपला दात तोडून सोनं कृष्णाला दिलं. त्यावेळी तुझे अंत्य संस्कार अशा व्यक्तीच्या हातून होतील, त्यामुळे तुझे पाप धुतले जातील, असं वरदान श्रीकृष्णाने दिलं होतं.

महाभारत युद्धाच्या 17 व्या दिवशी कर्ण आणि अर्जुन यांच्यात घनघोर युद्ध सुरू होतं. दोन्ही बलाढ्य वीर एकमेकांना आव्हान देत होते. पण कर्ण नेहमी अर्जुनावर भारी पडत होता. मात्र, श्रीकृष्ण अर्जुनाला साथ देत असल्याने त्याने कर्णाला मारण्यासाठी एक कल्पना दिली. कर्णाने हे दैवी शस्त्र अर्जुनासाठी राखून ठेवले होते. तर भीमाचा पुत्र घटोत्कच जेव्हा कौरव सैन्यावर कहर करत होता तेव्हा कर्णाला त्याच्यावर दैवी शस्त्र वापरण्यास भाग पाडलं होतं. त्यामुळे आता कर्णाची ताकद कमी झाली होती. अशातच श्रीकृष्णाने अर्जुनला दैवी शस्त्र वापरण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, युद्धाच्या 17 व्या दिवशी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत अडकले. त्यावेळी अर्जुनने आपल्या दैवी शस्त्राचा वापर केला अन् कर्णाचा वध केला. श्रीकृष्णाने धर्माच्या तत्वाची आठवून करून दिल्यानंतर अर्जुनाने कर्णाचा वध केला. ब्राम्हणी वेशभूषेत वचन दिल्याप्रमाणे श्रीकृष्णाने स्वत: जाऊन कर्णाचे अंत्यसंस्कार केले. कथेनुसार महाभारत युद्ध संपलं तेव्हा माता कुंती कर्णाचा मृतदेह आपल्या मांडीवर घेऊन रडत होती.