मुंबई : मुंबई शेअर बाजारात सुरूवातीला घसरण दिसत असली, तरी सोन्याचे भाव प्रतितोळा ४ हजाराने वाढला आहे. यामुळे ज्यांच्याकडे थोडंफार का असेना सोने आहे, त्यांच्यासाठी हा सोनियाचा दिन असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
५०० आणि १००० नोटा बंद करण्याचा निर्णय यामुळे सोन्याचे भाव वाढले नसल्याचं जाणकारांचं मत आहे, तर यामागे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयाकडे सुरू असलेली घौडदौड असल्याचं सांगण्यात येत आहे.
कारण जगभरात सोने आणि परकीय चलनात वाढ होत असताना दिसत आहे. सोन्याचे भाव आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.