गोव्यात विधानसभेसाठी उद्या मतदान

गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला असून ३ मार्चला मतदान होणार आहे. ४० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रथमच ममता बॅनर्जींच्या तृणमूलने उडी घेतली आहे. त्यामुळे गोव्याकडे लक्ष लागले आहे.

Updated: Mar 2, 2012, 11:28 AM IST

www.24taas.com,पणजी

 

गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला असून ३ मार्चला मतदान होणार आहे. ४० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रथमच  ममता बॅनर्जींच्या तृणमूलने उडी घेतली आहे. त्यामुळे गोव्याकडे लक्ष लागले आहे.

 

 

४० जागांसाठी होणा-या या निवडणुकीत १९पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण २१५उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी १ हजार ६१२मतदान केंद्रं असून यापैकी १८० मतदान केंद्रं संवेदनशील म्हणून घोषित कऱण्यात आली आहेत. यंदा प्रथमच पोल मॉनिटरिंग सिस्टिम राबवणार असल्याची माहितीही निवडणूक अधिका-यांनी दिली आहे. काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

 

 

गोमंतकीयांनी पुन्हा एकदा काँग्रेसला सत्तेवर येण्याची संधी द्यावी, असे आवाहन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी  केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत  गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंह राणे, केंद्रीय मंत्री , राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर उपस्थित होते. तर सुप्रशासनासाठी भाजपाला निवडा, असे आवाहन व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.  पश्चिम बंगाल काबीज केल्यानंतर गोव्याकडे आपला मोर्चा ममता बॅनर्जी यांनी वळवळा आहे. त्यांनी आपले उमेदवार उभे करून विकासाचे स्वप्न गोमंतकीयांना दाखवले आहे.  त्यामुळे उद्या होण्याऱ्या मतदानात किती टक्केवारी होते, यावरच राजकीय गणिते ठरणार आहेत.