गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद
ग़चिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. कुरखेडा तालुक्यातल्या झरी गावातल्या जंगलात ही घटना घडलीय. काल रात्री नक्षलविरोधी अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला.
Oct 17, 2013, 09:39 AM ISTगडचिरोलीत नक्षल्यांकडून पोलिसाची हत्या
गडचिरोलीतल्या असरअल्ली इथे नक्षवलावाद्यांनी एका पोलिस जवानाची हत्या केलीय. राजीव रेड्डी असं त्याचं नाव आहे.
Jun 27, 2013, 10:23 PM ISTकाँग्रेसच्या नेत्याने नक्षलवाद्यांना पुरवली शस्त्रे
सरकारी रुग्णवाहिकेतून नक्षलवाद्यांना शस्त्रास्त्र पुरवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीमध्ये उघडकीस आलाय. तसंच यामागे एका बड्या काँग्रेस नेत्याचा हात असल्याचंही आरोपींच्या जबाबातून स्पष्ट झालंय.
Jun 22, 2013, 10:41 PM ISTशस्त्रास्त्र फेकून एकमेकांचा हात घेतला हातात...
गडचिरोलीतल्या संतोष कोला आणि शांता कुडियामी यांचा लग्नसोहळा थोडा खास होता... कारण या लग्नसोहळ्याला पार्श्वभूमी आहे त्यांच्या आधीच्या जीवनाची... शस्त्रास्त्र... वरिष्ठांचा दबाव... पोलिसांचा ससेमिरा आणि सातत्यानं मरण्याची भीती... अशा नक्षली वातावरणाशी दोघांचा काही दिवसांपूर्वी संबंध होता.
Feb 5, 2013, 11:38 AM ISTसहा नक्षलवाद्यांना कंठस्नान
गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झालीय.. यांत सहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलंय. अहेरीतल्या जिलमगट्टा इथं ही घटना घडली. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.
Jan 20, 2013, 08:34 AM ISTधानोरा तालुक्यात नक्षलींचा धिंगाणा
गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात नक्षलींनी बांधकाम ठेकेदाराची २७ वाहनं जाळली. धानोरा तालुक्यातील गोडलवाही भागात रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचं काम सुरु आहे.
Jan 14, 2013, 11:26 AM ISTऊसदर आंदोलनाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा
शेतक-यांच्या ऊसदर आंदोलनाला आता नक्षलवाद्यांनीही पाठिंबा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतक-यांवर झालेल्या अन्यायाचा नक्षलवाद्यांनी निषेध केला आहे.
Nov 22, 2012, 09:32 AM ISTगडचिरोलीत दहशत नक्षलींची की पोलिसांची?
नक्षलवाद्यांच्या उच्छादामुळे आधीच दहशतीत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता लोकशाही धोक्यात आलीय. कोरची या अतिदुर्गम तालुक्यात आज ९० टक्के ग्रामपंचायतीतल्या लोकप्रतिनिधींनी एकाच दिवशी सामूहिक राजीनामे दिल्यानं प्रशासन हादरलंय. याशिवाय एकाच दिवशी ३० पोलीस पाटलांनीही राजीनामे दिलेत.
Jul 12, 2012, 11:17 PM ISTकर्मचारी 'लेट', निलंबन थेट
कर्मचारी वेळेवर न येणं हे सरकारी कामकाजाचं एक खास वैशिष्ट्य. मात्र गडचिरोलीतल्या सरकारी कार्यालयातल्या कर्मचा-यांना त्यांच्या या सवयीनं चांगलंच अडचणीत आणलंय.
Jul 8, 2012, 02:40 PM ISTगडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस
गडचिरोलीत तब्बल दीड महिन्यांपासून सुरू असलेला नक्षलवाद्यांचा हैदोस वाढतच चाललाय.अहेरी तालुक्यातील अतीदुर्गम येरमनार इथं सशस्त्र नक्षलवाद्यांनी रविवारी शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेचं बांधकाम प्रगतीपथावर सुरू असताना, इमारतीच्या बांधकाम साहित्याची मोठ्याप्रमाणात नासधूस केली.
May 29, 2012, 08:59 AM ISTनक्षलींकडून आणखी एक अपहरण...
गडचिरोलीत धानोरा पंचायत समितीचे माजी उपसभापती मेहतसिंग उसेंडी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलंय. धानोरा तालुक्यातल्या मुरूमगावमधून त्यांचं अपहरण करण्यात आलं.
May 20, 2012, 06:28 PM ISTनक्षली बंद : गडचिरोलीत वाहतूक ठप्प
नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय बंद दरम्यान गडचिरोलीच्या दुर्गम भागात वाहतूक ठप्प होती. बाजारपेठही बंद होती. नक्षलवाद्यांनी पत्रके आणि बॅनर टाकण्यात आली आहेत.
May 17, 2012, 02:03 PM ISTनक्षलवादी कारवाया, सर्तकतेचा इशारा
देशभरात नक्षलवादी कारवायांच्या पार्श्वभूमिवर गडचिरोलीत प्रशासनानं सर्तकतेचा इशारा दिलाय. लोकप्रतिनिधी तसंच महत्त्वाच्या व्यक्तींनी दुर्गम भागात जाताना खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेत. याबाबत एक पत्रचं त्यांना पाठवण्यात आले आहे.
Apr 30, 2012, 12:10 PM ISTनक्षलवाद्यांचा धुमाकूळ, दोघांची हत्या
गडचिरोली जिल्हय़ात राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांचे हत्यासत्र राबवणाऱ्या नक्षलवाद्यांनी बुधवारी रात्री धानोरा तालुक्यातील मरकेगावात आणखी दोघांची हत्या केली. ते एव्हढ्यावर न थांबता दहा जणांचे अपहरण केले. यामुळे जिल्हय़ात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नागरिकांच्या अपहरणाचा पोलिसांनी दावा फेटाळला आहे.
Apr 27, 2012, 01:05 PM ISTनक्षलवाद्यांनी केली राष्ट्रवादी नेत्याची हत्या
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची हत्या केली. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परीषद सदस्य केवल सावकार अतकमवार यांची भर चौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
Apr 14, 2012, 04:28 PM IST