www.24taas.com,गडचिरोली
शेतक-यांच्या ऊसदर आंदोलनाला आता नक्षलवाद्यांनीही पाठिंबा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतक-यांवर झालेल्या अन्यायाचा नक्षलवाद्यांनी निषेध केला आहे.
ऊसदर आंदोलनाला पाठिंब्याबाबत " माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा राज्य कमिटी सचिव कॉम्रेड सहय़ाद्री " ने एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात ` पश्चिेम महाराष्ट्रातील साखर सम्राट हे ऊसाचे गाळप करून नव्हे; तर शेतकर्यां ची पिळवणूक करून अरबपती बनले आहेत. मुख्यमंत्री मात्र शेतकर्यांकच्या मागणीशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचे सांगून साखर सम्राटांची पाठराखण करीत आहेत.
पश्चिशम महाराष्ट्रातील शेतकर्यांाच्या ऊसाला ३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, या मागणीचे माओवादी कम्युनिस्ट पक्ष सर्मथन करीत असून, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राज्यातील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रथमच माओवाद्यांनी शेतकर्यांरच्या आंदोलनाला सर्मथन दिल्याने पश्चिाम महाराष्ट्रात नक्षल चळवळ रुजविण्याचा नक्षल्यांचा हा प्रयत्न असू शकतो, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
या पत्रकात गडचिरोलीतील कथित सरकारी दमनतंत्र , मावळचा शेतकरी गोळीबार , जैतापूर येथील स्थानिकांचा अणु प्रकल्पाला असलेला विरोध ते थेट उस-उत्पादक शेतक-यांवरील अत्याचार असे विषय हाताळून राज्य भरतील विषयांवर प्रथमच आपली भूमिका मांडली आहे.