www.24taas.com, गडचिरोली
गडचिरोलीत धानोरा पंचायत समितीचे माजी उपसभापती मेहतसिंग उसेंडी यांचं नक्षलवाद्यांनी अपहरण केलंय. धानोरा तालुक्यातल्या मुरूमगावमधून त्यांचं अपहरण करण्यात आलं.
काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातल्या चिचगड तालुक्यातल्या इस्तारी गावाचे सरपंच घनश्याम पोरेट्टी यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यांचा मृतदेह भंडारा जिल्ह्यात सापडला होता. त्यानंतर आज पुन्हा एकाचं अपहरण नक्षलवाद्यांनी केलंय.
गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात चालू वर्षात १० लोकप्रतिनिधींची हत्या करण्यात आलीय. तसंच चौदा पोलीस कर्मचारीही नक्षलींचे बळी ठरलेत. ४९ निरपराध नागरिकांचीही नक्षलवाद्यांनी हत्या केलीय. अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातल्या विविध राजकीय पक्षांच्या सुमारे ४३ पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत. तर भामरागड आणि एटापल्ली तालुके नक्षलींच्या दहशतीखाली असल्याचं चित्र आहे.
व्हिडिओ पाहा :
[jwplayer mediaid="105076"]