गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस

गडचिरोलीत तब्बल दीड महिन्यांपासून सुरू असलेला नक्षलवाद्यांचा हैदोस वाढतच चाललाय.अहेरी तालुक्यातील अतीदुर्गम येरमनार इथं सशस्त्र नक्षलवाद्यांनी रविवारी शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेचं बांधकाम प्रगतीपथावर सुरू असताना, इमारतीच्या बांधकाम साहित्याची मोठ्याप्रमाणात नासधूस केली.

Updated: May 29, 2012, 08:59 AM IST

www.24taas.com, गडचिरोली

गडचिरोलीत तब्बल दीड महिन्यांपासून सुरू असलेला नक्षलवाद्यांचा हैदोस वाढतच चाललाय.अहेरी तालुक्यातील अतीदुर्गम येरमनार इथं सशस्त्र नक्षलवाद्यांनी रविवारी शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेचं बांधकाम प्रगतीपथावर सुरू असताना, इमारतीच्या बांधकाम साहित्याची मोठ्याप्रमाणात नासधूस केली.

५० ते ६०सशस्त्र नक्षलवाद्यांनी बांधकामस्थळी आग लावल्यानं जेसाबी मशीनसहीत एक ट्रक आणि बांधकाम साहित्य जळून खाक झालं. यात कंपनीचं सुमारे ९० लाखाचं नुकसान झालं.कामावर असलेल्या दिवाणजी आणि त्यांच्या सहका-यांनाही नक्षलवाद्यांनी बेदम मारहाण केली.

२३ मेला नक्षलवाद्यांनी याच कंपनीचा दिवाणजी बाबा उर्फ तोरम ठेंबरे यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या केली होती.या घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मुलभूत सोईंनाही नक्षली कडवा विरोध करत असल्याचं समोर आले आहे.

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="110238"]