धानोरा तालुक्यात नक्षलींचा धिंगाणा

गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात नक्षलींनी बांधकाम ठेकेदाराची २७ वाहनं जाळली. धानोरा तालुक्यातील गोडलवाही भागात रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचं काम सुरु आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 14, 2013, 01:01 PM IST

www.24taas.com, गडचिरोली
गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात नक्षलींनी बांधकाम ठेकेदाराची २७ वाहनं जाळली. धानोरा तालुक्यातील गोडलवाही भागात रस्ता रुंदीकरण आणि मजबुतीकरणाचं काम सुरु आहे.
या कामावर २० टॅक्ट्रर, दोन जेसीबी, दोन पाण्याचे टँकर दोन दुचाकी आणि एक रोड रोलर अशी सत्तावीस वाहनं जाळली. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
नक्षलींनी बांधकाम मजुरांना बंदुकीच्या जोरावर वाहनं एका रांगेत उभी करण्यास सागून ती वाहनं जाळली. त्यानंतर मजुरांना त्या ठिकाणाहून जाण्यास सांगितलं.

नक्षल्यांच्या पिपल्स लिबरेशन गुरील्ला आर्मीनं या जाळपोळीची जबाबदारी स्वीकारलीये. नक्षलींनी या भागातील रस्तेही खोदून ठेवले होते. त्यामुळं पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यात अधिक उशीर झाला.