delhi

बुखारींकडून भारताच्या नव्हे पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण!

जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या आमंत्रितांमध्ये समावेश करायचा नाहीय पण, त्यांना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे मात्र आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणं आवश्यक वाटतंय. 

Oct 30, 2014, 03:48 PM IST

शाह-गडकरींचा मुंबई दौरा रद्द, फडणवीस दिल्लीला!

राज्याचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीसाठी रवाना झालेत. त्यांनी सकाळीच ओम माथूर यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीकडे निघाले. 

Oct 30, 2014, 10:31 AM IST

दिल्लीत निवडणुका लागण्याची शक्यता

दिल्लीत सद्यस्थितीत कोणताच पक्ष सत्तास्थापन करू शकत नसेल, तर तिथे नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकते, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. 

Oct 29, 2014, 05:22 PM IST

शिवसेनेची दिल्लीत भाजप नेत्यांशी पडद्याआड चर्चा

शिवसेना नेते दिल्लीहून मुंबईत परतलेत. मात्र, शिवसेना नेत्यांची भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली की नाही याबाबत संभ्रम आहे. दरम्यान, युतीसंदर्भातील निर्णय पक्षातर्फेच घेतले जात असल्याने यावर सविस्तर चर्चा करुन पुढील निर्णय घेतले जातील, असे भाजप नेते जे. पी. नड्डा यांनी शिवसेनेसोबतच्या युतीबाबत भाष्य केले.

Oct 22, 2014, 01:04 PM IST

मी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अखंड महाराष्ट्राची घोषणा केलीय. मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केलीय. 

Oct 7, 2014, 11:58 AM IST

जनकपूरीच्या डी. ब्लॉकमध्ये सापडली बेपत्ता चिमुकली जान्हवी

राजधानी दिल्लीच्या इंडिया गेटपासून बेपत्ता झालेली ३ वर्षीय चिमुकली जान्हवी रविवारी संध्याकाळी पोलिसांना सापडली. २८ सप्टेंबरला जान्हवी इंडिया गेटहून बेपत्ता झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना जान्हवी जनकपूरीच्या डी. ब्लॉकमध्ये सापडली. जान्हवीचे मामा श्याम ग्रोवर आणि पोलिसांनी याबाबत माहिती दिलीय. जान्हवीची ओळख लपविण्यासाठी तिला टकलं केलं गेलं होतं. 

Oct 6, 2014, 08:05 AM IST

रावण दहनानंतर पाटण्यात चेंगराचेंगरी, 32 ठार, १००हून अधिक जखमी

बिहारची राजधानी पाटण्यात मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 32 जणांचा मृत्यू, तर तब्बल शंभरहून अधिक नागरिक जखमी आहेत. याबाबतचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

Oct 3, 2014, 09:55 PM IST

रिझर्व्ह बँक दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न? - राणेंचा आरोप

रिझर्व्ह बँक दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. 

Sep 24, 2014, 07:12 PM IST

जानकर आणि शेट्टींचे स्वबळावर लढण्याचे संकेत

महायुतीतील वाढता तणाव पाहता, युती तुटण्याच्याच मार्गावर आहे, असं चित्र दिसतंय. जर युती तुटली तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल, असे संकेत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले आहेत. स्वबळावर लढायचं असल्यास जानकर १५० जागांवर आपले उमेदवार उभे करतील. 

Sep 21, 2014, 03:27 PM IST