रिझर्व्ह बँक दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न? - राणेंचा आरोप

रिझर्व्ह बँक दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. 

Updated: Sep 24, 2014, 07:12 PM IST
रिझर्व्ह बँक दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न? - राणेंचा आरोप title=

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक दिल्लीला हलवण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. 

मुंबईतील रिझर्व्ह बँक दिल्लीला हलवली तर मुंबई आणि महाराष्ट्राचं महत्व कमी होणार आहे, हे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.

ज्या मुंबईसाठी 105 हुतात्मा झाले त्या मुंबईतील रिझर्व्ह बँक दिल्लीला हलवून मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप आपला असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

रिझर्व्ह बँक दिल्लीला हलवली तर मुंबईतील उद्योगधंद्याचं स्थलांतर होऊन मुंबईची दैना होणार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.