बुखारींकडून भारताच्या नव्हे पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण!

जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या आमंत्रितांमध्ये समावेश करायचा नाहीय पण, त्यांना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे मात्र आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणं आवश्यक वाटतंय. 

Updated: Oct 30, 2014, 03:48 PM IST
बुखारींकडून भारताच्या नव्हे पाकच्या पंतप्रधानांना निमंत्रण! title=

नवी दिल्ली : जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या आमंत्रितांमध्ये समावेश करायचा नाहीय पण, त्यांना पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे मात्र आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणं आवश्यक वाटतंय. 

बुखारी यांनी आपल्या मुलाच्या दस्तारबंदी कार्यक्रमासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण दिलंय. पण, त्यांच्या या ‘गेस्ट लिस्ट’मध्ये पंतप्रधान मोदींचं मात्र नाव नाही. 

बुखारी यांनी आपल्या १९ वर्षीय छोट्या मुलाला – शाबान बुखारी - याला आपला वारसदार म्हणून घोषित केलंय. २२ नोव्हेंबर रोजी दस्तारबंदीच्या विधीसोबतच शाबानला ‘नायाब इमाम’ म्हणून घोषित केलं जाईल. हा समारंभ २२ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलाय. यासाठी देश-विदेशातून हजारो धार्मिक गुरू दाखल होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण न दिल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बुखारी यांनी, पंतप्रधान मुसलमानांच्या प्रतिकं वापरण्यासही टाळाटाळ करतात... त्यांच्या या वागणुकीमुळेच मुसलमानांना त्यांच्याशी अजूनही आपुलकी वाटत नाही. मोदींना मुसलमानांमध्ये विश्वास तयार करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. अजुनही मुसलमानांमध्ये मोदींविषयी विश्वास वाटत नाही.

नवे इमाम स्थानापन्न होताना या कार्यक्रमात भाजपचे चार नेते गृहमंत्री राजनाथ सिंह, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल यांनाही आमंत्रित करण्यात आलंय. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, अभिषेक मनु सिंघवी, समाजवादी पार्टी प्रमुख मुलायम सिंह यादव, मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचंही नाव आमंत्रितांच्या यादीत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.